• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

कमी वजन असल्यामुळेही येऊ शकतात गर्भधारणेत अडथळे !

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 15, 2019
in ताज्या घडामाेडी
0
Pregnancy
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन जास्त असल्याने किंवा वजन कमी असल्यानेही गर्भधारणेत अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. गर्भधारणेच्या कालावधीत वजनाला खूप महत्त्व आहे. कमी वजन असलेल्या महिलांमध्ये ‘प्रीटर्म बर्थ’चा धोका जास्त असतो. मुलांचे वजन सर्वसामान्यापेक्षा अधिक कमी असते. ज्यामुळे मुलांनाही अनेक समस्या येऊ शकतात. यात अॅनिमिया यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

२२ ते ३४ या वयात महिलांनी गर्भधारणेला प्राथमिकता द्यावी. कारण या कालावधीत गर्भधारणा उत्तम समजली जाते. १८ ते २५ या वयात आपल्या आरोग्य निर्देशांकाकडे लक्ष ठेवून असावे. निर्देशांक अधिक कमी अथवा जास्त झाल्यास त्याचेही परिणाम दिसून येतात. नियमित व्यायाम केला पाहिजे, सकस आहार घ्यावा, वेळेवर जेवण करावे, वजन अधिक असेल तर दही, तूप, लोणी, साखर यासारखे स्निग्ध पदार्थ वर्ज्य करावेत. फळे व हिरवा भाजीपाला खाव्यात.

कमी वजनामुळे वंध्यत्वाचा धोका असतो. कमी वजनाचा अर्थ आहे की शरीरात कमी प्रमाणात फॅटचे प्रमाणे असणे. ओव्यूलेशन आणि मासिक पाळी होण्यासाठी शरीरात फॅट २२ टक्के असावे. शरीरात फॅट कमी असतील आणि मासिकपाळी नियमित होत असूनही गर्भधारणा होईलच याची हमी नसते. शरीराचे वजन वाढल्याने हार्मोन्स वाढतात. यात ओव्यूलेशनवर परिणाम होऊन गर्भधारणेची शक्यता कमी होते. वजन वाढल्यास गर्भपाताचाही धोका असतो. तसेच आईवीएफ उपचारात अडचणी येऊ शकतात.

Tags: arogyanamaconceiveFatFoodhealthMenstrual periodPregnancyproblemsweightअडचणीआईवीएफआजारआरोग्यआरोग्यनामाआहारगर्भधारणाप्रीटर्म बर्थफॅटमासिक पाळीवंध्यत्ववजन
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021