आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतीय महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची समस्या सामान्य आहे. महिला याकडे फारसे लक्ष देत नाहीत. भारतात केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की उत्तर भारतात राहणाऱ्या ६९% महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. याशिवाय सुमारे २६ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण पुरेसे असते आणि फक्त ५ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण योग्य असते.
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कारणे…
१) कमी सूर्यप्रकाश-
सूर्याची किरणे हे व्हिटॅमिन डीचा पुरेसा स्रोत आहे. पण भारतातील बहुतेक स्त्रिया घरातील कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
२) महिलांचा पोशाख-
महिलांचा पोशाख हे देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे एक कारण आहे. इथल्या बर्याच स्त्रिया साड्या किंवा सूट घालतात. त्यामुळे प्रत्येक भाग झाकलेला असतो.त्यामुळे शरीरावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
३) हार्मोन्स बदल-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही महिलांमध्ये हार्मोन्स बदल दिसून येतात. याशिवाय बाळांना दूध देणाऱ्या महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
रिफाइंड तेलाचा वापर-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे मुख्य कारण रिफाइंड तेल आहे. वास्तविक रिफाइंड तेलाचा वापर केल्याने शरीरात कोलेस्टेरॉल कमी तयार होतो. हे कण शरीरात कोलेस्टेरॉल तयार करण्यास मदत करतात. यामुळे, शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास सुरूवात होते.
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity
लक्षणे
१) काहीही काम न करता कंटाळा येणे.
२) बराच काळ उभे राहण्यास त्रास.
३) पाय दुखणे आणि पायात सूज
४) स्नायूचा कमकुवतपणा.
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
तोटा
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचे हळूहळू नुकसान होते. प्रथम ते शरीराचे सर्व भाग कमकुवत करते. नंतर म्हातारपणी हाडे, स्नायू आणि सांध्यामध्ये अधिक वेदना होतात.
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
कसे मात करावे
१) कमी कपड्यांमध्ये दररोज एक तास सूर्यप्रकाश घ्या.
२) अंड्यातील पिवळा भाग आणि मासे आहारात समाविष्ट करा.
३) व्हिटॅमिन डीचे ओरल सप्लीमेंट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले जाऊ शकते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या