आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल दिसतोच. तसे मोबाईल वापरणे ही चुकीची गोष्ट नाहीये परंतु त्याचा अतिवापर ही चुकीची बाब आहे आणि प्रत्येकजण मोबाईलचा अतिवापर करताना दिसतोय. स्मार्टफोन, किंडलबुक,टॅब यांसारख्या विविध उपकरणांचा वापर मनुष्य हा बेडरूम ते बाथरूम पर्यंत करत आहे आणि हे करतअसतांना माणसाला त्याच्या आरोग्यावर काय काय वाईट परिणाम होतात याचा जराही विचार नाही. बाथरूममध्ये मोबाईल नेल्याने बॅक्टरीया तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला लागतात व तेच तुमच्या हातालाही लागतात. त्यामुळे तुम्हाला इन्फेकशन होऊन विविध आजार होतात.
बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने ANUS इन्फेकशन होऊन बवासीर होण्याची शक्यता असते.
फोनवर बोलल्याने मोबाईलला चिकटलेले बॅक्टरीया श्वसनमार्गात प्रवेश करतात. त्यामुळे फ्लू होण्याची दाट शक्यता असते.
फोनवर इकोलाई आणि इतर मायक्रोबाईल बॅक्टरीया असल्याने टॉयलेट मधील बॅक्टरीयांचं संक्रमण होऊन तुम्हाला इन्फेकशन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
मोबाइलचा वापर करत जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहिल्याने फंगल इन्फेकशन होते. त्यामुळे विविध आजार होऊ शकतात.
जास्तवेळ बाथरूम मध्ये बसून राहिल्याने ANUS च्या मांसपेशींवर वाईट परिणाम होऊन फिशरची समस्या उदभवू शकते.
अशा प्रकारच्या घातक आजारांपासून वाचण्यासाठी बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये मोबाईलचा अतिवापर करू नये.