आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जे केवळ शाकाहार घेतात त्यांना ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळवण्यासाठी अक्रोड (Walnuts) हा सर्वात चांगला पर्याय आहे. अक्रोडच्या टरफलांमध्येही औषधी गुणधर्म आहेत. अक्रोडमधील व्हिटॅमिन ए हे आर्टरीजमध्ये प्लाक जमा होऊ देत नाही. यातील न्यूट्रीएंट्स शरीरातील आर्टरीजचा ब्लॉकेजपासून बचाव करतात. सकाळ, संध्याकाळ २ अक्रोड (Walnuts) खाल्ल्याने अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास कोणते आरोग्य फायदे होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
उपाय आणि फायदे
१ रोज सकाळ, संध्याकाळ दोन अक्रोड चावून खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतात. हृदयरोग होत नाहीत.
२ अक्रोडची टरफलांसह बारीक पावडर करून एक चमचा सकाळ, संध्याकाळ खाल्ल्यास किडनी स्टोन निघून जातो.
३ रोज दोन अक्रोड मधासोबत खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.
४ दोन अक्रोड चार लसणाच्या पाकळ्यांसह तुपात भाजून खाल्ल्यास टीबीच्या आजारात आराम मिळतो.
५ दोन अक्रोड, एक बदाम, पाच मणुके सकाळ, संध्याकाळ कोमट दुधासोबत घेतल्यास कमजोरी दूर होते.
६ अक्रोडच्या टरफलांचा काढा तयार करून मध टाकून घेतल्यास पीरियड्सच्या समस्यांपासून आराम मिळातो.
७ अक्रोडमधील गर भाजून मधासोबत खाल्ल्यास खोकला कमी होतो.
८ अक्रोडचे टरफल भाजून त्यांचे दंतमंजन तयार करावे. याने दात मजबूत आणि पांढरे होतात.
९ गरम दुधासोबत अक्रोड खाल्ल्याने पोटातील जंत मरतात.
१० सकाळी उपाशीपोटी दोन अक्रोड आणि एक चमचा सुंठ गरम पाण्यासोबत घेतल्यास सांधेदुखीत आराम मिळतो.
High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर