आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी अंडे खूप उपयुक्त आहे. यासाठी अनेकजण अंड्याचे सेवन नियमित करतात. परंतु, जास्त प्रमाणात आणून ठेवलेली अंडी कधीकधी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय, बाजरात सुद्धा खराब अंडी मिळू शकतात. अंडे खराब झाले आहे का, हे लवकर समजत नाही. यासाठी काही साध्या पद्धती असून त्या आपण जाणून घेवूयात.
१ एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अंडे टाका. अंडे ताजे असेल तर ते पूर्णपणे पाण्यात बुडेल आणि खराब असेल तर पाण्यावर तरंगेल.
२ अंडे कानावजळ हलवून पहा. खराब असेल तर आतून लिक्विड हालल्याचा आवाज येईल.
३ अंडे एका बाऊलमध्ये फोडून घ्या. यातून दुर्गंधी येत असेल तर अंडे खराब आहे.
४ अंड्याच्या कवचाचा रंग फिकट हिरवा, फिकट गुलाबी, फिकट काळा असेल तर अंडे खराब आहे, असे समजावे.
खराब अंड्याचा वापर
खराब अंडे फोडून झाडांना टाकले तर झाडांची वाढ चांगली होते. खताप्रमाणे ते काम करते. शिवाय, अंड्याच्या टरफलाची बारीक पावडर करून झाडांना टाकल्यास झाडे जोमाने वाढतात.