आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतीय तिळाचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूंना विशेष महत्व असते. या तेलाचा उपयोग खाद्यतेल म्हणूनही केला जातो. अनेक भागात तिळ औषधी म्हणून वापरले जातात. तिळाचे काही पारंपारिक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
* महिलांना मासिक काळात जास्त त्रास होत असेल तर ५ ग्रॅम तिळ. ३ ग्रॅम बडीशेप आणि ५ ग्रॅम गुळामध्ये मिसळून बारीक करून घ्या.
* वारंवार लघवीला जाण्याचा त्रास असेल तीळ आणि ओवा समान प्रमाणात तव्यावर भाजून घ्यावा. हे मिश्रण दिवसातून कमीतकमी दोन वेळेस एक-एक चमचा खावे.
* भाजलेल्या तीळ आणि ओव्याचे मिश्रण दिवसातून ४-५ वेळेस थोडे थोडे खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांना लाभ होतो.
* तिळाचे, आवळ्याचे चूर्ण आणि हळद प्रत्येकी २ ग्रॅम घेवून एक बादलीभर पाण्यात टाकून या पाण्याने स्नान केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतात. त्वचा उजळेल.
* एक चमचा बेलफळातील गर ३ चमचे तिळाच्या तेलामध्ये गरम करून बहिऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये दररोज एक-एक थेंब टाकल्यास बहिरेपण दूर होते.
* कानामध्ये सूज, मळ झाला असेल तर लसणाची पाकळी, चिमुटभर हळद आणि लिंबाची पाच पाने दोन चमचे तिळाच्या तेलात गरम करून थंड झाल्यानंतर हे तेल कानात दोन थेंब टाकावे.
* १० ग्रॅम अमरवेल बारीक करून वीस मिली तिळाच्या तेलात पाच मिनिट उकळून थंड करून घ्या. थंड झालेले तेल डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास केस पुन्हा येण्याची शक्यता वाढते.
* मुळव्याध असल्यास १० ग्रॅम तीळ ५० मिली पाण्यात उकळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी लावल्यास लवकर फरक पडतो.
* थंडीमध्ये तीळ आणि गुळाच्या पाकाचे मिश्रण शरीराला उर्जा प्रदान करते. ग्रामीण भागात तिळाचा उपयोग सर्दी दूर करण्यासाठी केला जातो.