आरोग्यानामा ऑनलाइन टीम – अचानक डोळ्यांसमोर अंधार पसरणे. चारही बाजूच्या वस्तू गरागरा फिरताना दिसणे. यास चक्कर असे म्हणतात. डोक्यामध्ये रक्ताची पूर्ती कमी झाल्याने असे होते. रक्तदाब अचानक कमी झाल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती निर्माण होते. घरातील काही गोष्टींचा वापर करून यावर उपचार करता येतात. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
* काही कारण नसताना चक्कर येत असल्यास दुपारच्या जेवणाच्या २ तास आधी आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचा ज्यूस घ्या. दररोज ज्यूस घेतल्यास चक्कर येणे बंद होईल. परंतु या ज्यूसमध्ये कोणत्याही प्रकराची साखर आणि मसाला टाकू नये.
* नियमितपणे नारळपाणी घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.
* चहा आणि कॉफी कमी प्रमाणात घ्यावी. जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी घेतल्यास चक्कर येते.
* २० ग्रॅम मनुका शुद्ध तुपामध्ये भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये काळे मीठ मिसळून खाल्ल्यास चक्कर येणे बंद होईल.
* खरबूजमधील बिया बारीक कुटून तुपात भाजून घ्या. त्यानंतर हे चूर्ण थोडे थोडे दररोज सकाळ-संध्याकाळ घ्या. यामुळे चक्कर येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
* चक्कर येत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसामध्ये साखर मिसळून हे मिश्रण घ्यावे किंवा तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होईल.
* वारंवार चक्कर येत असल्यास धने पावडर दहा ग्रॅम तसेच आवळा पावडर दहा ग्रॅम एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. यामुळे चक्कर येणे बंद होईल.
* अचानक चक्कर आल्यास अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंगा टाकून पाणी उकळून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्याने लाभ होईल.
* १० ग्रॅम आवळा, ३ ग्रॅम काळी मिरी आणि १० ग्रॅम बत्ताशे बारीक करून घ्या. १५ दिवस नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केल्यास चक्कर येणे बंद होईल.