आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आहारात लोहाची कमतरता असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. आहारात आयर्न आणि प्रोटीनसारख्या भरपूर तत्त्वाचा वापर करुन हिमोग्लोबिनचा स्तर वाढवता येऊ शकतो. लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे जास्त असते. जेव्हा किडनी एरीथ्रोप्रोटीनचे उत्सर्जन कमी प्रमाणात करते तेव्हा ही समस्या होते. खालील काही घरगुती उपाय करून तुम्ही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवू शकता.
१) हिरव्या भाज्या :
शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, अंडी, नारळ, गुळ, नाशपती, दाळवे अशा पदार्थांचा आहारात समावेश करायला पाहिजे. यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.
२) सफरचंद :
सफरचंद खाल्ल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात रक्त तयार होते. त्यामुळे सफरचंद एनीमियासाठी खुप फायदेशीर असेत. सफरचंद खाल्ल्याने शरीरात हीमोग्लोबीन वाढते.
३) द्राक्षे :
द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. जे शरीरात हिमोग्लोबिनची निर्मीती करते. याव्यतिरिक्त हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांना बरे करण्यासाठी हे फायदेशीर असते.
४) बीट :
यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते. आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते. बिटापेक्षा जास्त लोह त्याच्या पानांमध्ये असते.