आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Tips For Healthy Bones | एखादे काम करताना किंवा धावताना हात, पाय किंवा शरीराच्या विविध सांध्यांमध्ये दुखत असेल तर ते कमकुवत हाडांचे लक्षण (Symptoms Of Weak Bones) असू शकते. खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) आजकाल लोकांमध्ये सांधेदुखीची समस्या (Joint Pain Problem) वाढत आहे. पूर्वी असे मानले जात होते की केवळ 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच हाडांशी संबंधित समस्या होते, परंतु आता लहान मुलांपासून तरूणांपर्यंत ही समस्या घराघरात सुरू आहे (Tips For Healthy Bones). ही समस्या टाळायची असेल तर आज तुम्हाला त्या 5 चुकांपासून स्वतःला दूर ठेवावे लागेल, ज्या तुम्ही नकळतपणे रोज करून नकळत या आजाराला आमंत्रण देत आहात (Weak Bones). त्या 5 चुका कोणत्या आणि त्या कशा टाळता येतील, ते जाणून घेवूयात (These 5 Mistakes Can Do Your Bones Weak)…
या कारणांमुळे हाडे होतात कमकुवत (These Causes Weaken Bones)
1. धुम्रपान, मद्यपान थांबवा (Stop Smoking, Drinking)
तुम्ही धुम्रपान करत असाल किंवा मद्यपान करत असाल तर तुम्ही या दोघांचे सेवन ताबडतोब थांबवावे. वास्तविक या दोन्ही गोष्टी थेट तुमची हाडे कमकुवत बनवण्याचे काम करतात (Cause Of Weakening Of Bones). याचा परिणाम शरीरातील फुफ्फुस आणि किडनीवर तर होतोच (Tips For Healthy Bones), पण तुमची हाडेही हळूहळू कमकुवत होऊन तुटायला लागतात. म्हणून, शक्य तितक्या लवकर धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे चांगले (Alcohol And Smoking Can Impact Bone Health).
2. पुरेशी झोप आणि व्यायाम आवश्यक (Adequate Sleep And Exercise Are Essential)
पुरेशी झोप आणि योग्य शारीरिक हालचाली चांगल्या आरोग्यासाठी (Healthy Health) खूप महत्त्वाच्या आहेत. जर 7-8 तास पुरेशी झोप घेण्याऐवजी तुम्ही सतत मोबाईल घेऊन बसून राहिल्यास किंवा बेडवर पडून राहिल्यास हाडे कमकुवत होण्याची पूर्ण शक्यता असते. खरं तर, मजबूत हाडांसाठी योग्य झोप आणि नियमित शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. असे न केल्यास हाडे तुटण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.
3. दिवसा सूर्याची किरणे अंगावर घ्या (Take Rays Of Sun During Day)
बरेच लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात आणि दिवसा झोपतात. अशावेळी त्यांना सूर्याची पुरेशी किरणे मिळत नाहीत. हे किरण व्हिटॅमिन डी (Vitamin D) चा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता (Calcium Deficiency) दूर होते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहिल्याने हाडे मजबूत (Strong Bones) राहतात आणि सांधे दुखत नाहीत. शक्य असल्यास, रात्रीची शिफ्ट संपल्यानंतर, अर्धा तास उन्हात कुठेतरी फिरा, जेणेकरून तुमची हाडे तंदुरुस्त राहतील.
4. कॅल्शियम युक्त गोष्टी खा (Eat Calcium Rich Foods)
शरीरातील हाडे कमकुवत होण्याचे प्रमुख कारण म्हणजे दूध-अंडी आणि कॅल्शियम (Calcium Rich Foods) असलेल्या इतर पौष्टिक गोष्टींचे सेवन न करणे. विशेषतः जर तुम्ही दुधाचे सेवन केले नाही तर तुम्हाला पूर्वीपेक्षा कमजोर हाडे होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच दिवसातून एकदा तरी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही हा सल्ला हलक्यात घेऊ नका आणि नियमितपणे दूध सेवन करा.
5. जास्त मीठ खाणे टाळा (Avoid Eating Too Much Salt)
जेवणात मीठ नसेल तर त्याची चव बिघडते, पण जर तुम्ही मीठ जास्त (Salt Level) प्रमाणात खाण्यास सुरुवात केली
तर ते तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरते. वास्तविक, जास्त मीठ असलेल्या गोष्टी खाल्ल्याने हाडांची घनता कमी होऊ शकते.
मीठामध्ये सोडियम नावाचे तत्व असते, ज्यामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते. जितके जास्त मीठ खाल तितके शरीरातील कॅल्शियम कमी होते.
त्यामुळे मीठ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Tips For Healthy Bones | tips for healthy bones cause of weakening of bones
Hair Fall | गळणार्या आणि पातळ केसांमुळे होऊ नका त्रस्त, केवळ खोबरेल तेलात मिसळा या 2 वस्तू
Coriander Seeds | धने वापरल्याने उजळेल चेहरा, रोज करून पहा हा उपाय
Neem Leaves | फंगल इन्फेक्शन झाल्यास वापरा लिंबाची पाने, जाणून घ्या 5 पद्धती