आरोग्यनामा टीम – तुम्ही डाएट करत असताना बाजारातून अनेक प्रकारचं रेडी आणि फॅकेज्ड फूड आणता. हे फूड हेल्दी आहे असं समजून तुम्ही त्याचा डाएटमध्ये समावेश करता. परंतु असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण असे अनेक पदार्थ आहेत जे हेल्दी आहेत असं सांगून बाजारात विकले जातात, परंतु ते आरोग्यासाठी घातक ठरतात. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.
1) पॅकेज्ड फ्रूट ज्यूस – अनेक लोक पॅकेज्ड फ्रूड ज्यूस घेतात. त्यांना वाटत असतं की, हे हेल्दी आहे. हेल्दी वाटणाऱ्या या पॅकेज्ड ज्युसमध्ये सोडा असणाऱ्या ड्रिंक एवढीच साखर वापरलेली असते. त्यासाठी पॅकेज्ड ज्यूसऐवजी आहारात फ्रेश ज्यूसचा वापर करावा. हेल्दी रहायचं असेल तर ज्यूस ऐवजी सर्वात उत्तम पर्याय आहे तो म्हणजे फळं. फळांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. म्हणून ते आरोग्यासाठी चांगले असतात.
2) सोया मिल्क – जर तुम्ही नॉर्मल दुधाऐवजी सोया मिल्कचा वापर करत असाल तर असं करणं टाळावं. तसं पाहिलं तर आरोग्यासाठी सोया मिल्क हेल्दी आहे असं सांगितलं जातं. परंतु प्रमाणापेक्षा जास्त जर याचं सेवन केलं तर यामुळं शरीरात अॅस्ट्रोजन रिसेप्टर अॅक्टीव होतात. यामुळं शरीराला अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. त्यामुळं सोया मिल्कचं सेवन करणं टाळावं.
3) न्युट्रिशन बार – न्युट्रीशन बार हे चविष्टही असतात आणि पोट भरण्यासाठी मदतही करतात. परंतु यातील कॅलरीज, फॅट, कार्ब्स बर्न करणं खूप अवघड जातं. याचं सेवन करण्याऐवजी फ्रेश फळांचं सेवन करणं कधीही उत्तम आहे.
4) फ्लेवर्ड ओटमील – ज्या कोणत्या फूड प्रॉडक्टमध्ये कॉर्न सीरप, अॅडेड शुगर आणि ट्रान्स फॅट असतात असं प्रॉडक्ट तुम्हाला लगेच किचनमधून बाहेर काढायला हवं. यापैकीच एक आहे ते म्हणजे फ्लेवर्ड ओटमील पॅकेट्स. यामध्ये ट्रान्स फॅट खूप असतात. हेच शरीरात गुड कोलेट्रॉल कमी करतात आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवतात.
5) क्रीम बेस्ड सूप – सूप आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु बाजारात विकले जाणारे पॅकेट सूप पिण्याऐवजी तुम्ही जर ताज्या भाज्यांपासून सूप तयार केलं आणि त्याचं सेवन केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. बाजारात मिळणाऱ्या पॅकेज्ड सूपमध्ये हायड्रोलाईज्ड प्रोटीन, फूड डाय आणि कॉर्न सीरप यांचं प्रमाण जास्त असतं जे आरोग्यासाठी हानिकारक असतं.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.