वजन कमी करण्यासाठी ‘फॅट फ्लश डाएट प्लॅन’ ट्राय करा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फॅट फ्लश डाएट प्लॅनने वजन कमी होण्यासोबतच बॉडी डिटॉक्सही होते. वजन कमी करण्यासाठी हा प्लॅन सध्या चर्चेत आहे. हा प्लॅन न्यूट्रिशनिस्ट ऐन लूइसे गिटलमॅन यांनी तयार केला आहे. ऐन लुईस गिटलमॅन एक अमेरिकन लेखक आणि अल्टरनेट मेडिसिनच्या समर्थक आहेत. तसेच त्या एक न्यूट्रिशनिस्ट आहेत. दोन डझनपेक्षा अधिक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी फॅट फ्लश प्लॅनवर बिऑंड प्रिटिकिन हे पुस्तकही लिहिले आहे. हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित झाले आहे.
लिव्हरचे कार्य फॅट बर्निंगसाठी अधिक चांगले करणे हा या डाएट प्लॅनचा मुख्य उद्देश आहे.
या डाएट प्लॅनमधील आहारामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होऊन शरीरातील फॅट वेगाने कमी होते. तरल पदार्थ बाहेर काढणारी प्रणाली सुद्धा सक्रिया होते. फॅट फ्लश डाएट प्लान तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केला जातो. यामध्ये डिटॉक्स, वेट लॉस आणि वजन नियंत्रित ठेवणे हे टप्पे आहेत. वजन कमी करण्याच्या फॅट फ्लश डाएट प्लॅनच्या पहिल्या टप्प्यात लिव्हर आणि लाइम्फॅटिक सिस्टीमला डिटॉक्स करण्यावर जास्त भर दिला जातो. यामध्ये एक्सरसाइजही महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये यात क्रेनबेरी ज्यूस आणि पाणी एकत्र करून सेवन केले जाते. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि वॉटर रिटेंशन कमी केले जाते. रोज हे मिश्रण सेवन केले जाते. यादरम्यान कॅलरीचे प्रमाण १,१०० ते १,२०० प्रतिदिवस ठेवण्यात येते. यात गहू आणि डेअरी पदार्थ खाण्याची मनाई आहे.
या डाएटच्या दुसऱ्या टप्प्यात कॅलरी जरा वाढवून घेण्यास परवानगी दिली जाते. सोबतच डाएटमध्ये थोड्या काब्र्सचाही समावेश करू शकता. यात वजन कमी करण्यावर भर दिला जातो. फॅट फ्लश डाएटच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात कमी केलेले वजन नियंत्रित ठेवण्यावर भर दिला जातो. यात काही मोजक्याच डेअरी प्रॉडक्टचा वापर करण्याची परवानगी आहे. हा डाएट प्लान एक्सरसाइजसोबत अधिक प्रभावी मानला गेला आहे. पण कोणताही डाएट प्लॅन फॉलो करताना आहारात ठरवून दिल्याप्रमाणे आणि कोणताही बदल न करता घ्यायला हवा. तसेच हा डाएट प्लॅन फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.