आरोग्यानामा ऑनलाइन टीम – तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांपासून कॅन्सर, अन्य क्रोनिक आजार होण्याचा धोका असणाऱ्यांसाठी भारतातील सुरक्षित, नावीन्यपूर्ण, नैसर्गिक न्यूट्रास्युटिकल उत्पादन स्वर्णसाथी हे सुरक्षा कवच प्रदान करू शकते. बेस्टोकेम फॉम्र्युलेशन्स (आय) लि. या भारतातील सुविधा समूहाच्या बिगब्रदर न्यूट्राकेअर प्रा. लि. या न्यूट्रास्युटिकल कंपनीने हे उत्पादन तयार केले आहे. स्वर्णसाथी हा बेस्टोकेम समूहाचा स्वस्थ्य भारत अंतर्गत वेलनेस उपक्रम आहे.ओरल कॅन्सरचा प्री-कॅन्सरस टप्पा असलेल्या रूग्णांमध्ये स्वर्णसाथीचा प्राभव जाणून घेण्यासाठी प्रयोग करण्यात आला असता स्वर्णसाथी हे ओएसएमएफ रुग्णांमध्ये आणि यासंबंधीच्या लक्षणांच्या बाबतीत प्रभावी असल्याचे आढळून आल्याचा दावा या कंपनीने केला आहे. स्वर्णसाथी वापरून क्लिनिकल चाचणी करण्यात आली असता सूज आणि अल्सरेशन लक्षणीय कमी झाली, ओएसएमएफची पुढील वाटचाल रोखली गेली, ओरल मुकोसाची हालचाल लक्षणीय वाढली फायब्रॉसिस काही प्रमाणात कमी झाले, प्रतिकारक्षमता सुधारल्याने ओरल मुकोसाची आणि सबमुकोसाची क्षमता वाढून आजारावर मात करण्यास मदत झाली, असे आढळून आले.
कॅन्सर हे जगभरात मृत्यूंमध्ये दुसरे प्रमुख कारण असून २०१५ मध्ये कॅन्सरमुळे ८.८ दशलक्ष लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जगभर ६ पैकी १ मृत्यू कॅन्सरमुळे होतो. सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये, टोबॅको-रिलेटेड कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २२ टक्के मृत्यूंना हा कॅन्सर कारणीभूत असतो. जगातील अंदाजे ७० टक्के लंग कॅन्सरशी आणि भारतातील सर्व प्रकारच्या ४० टक्के कॅन्सरशी तंबाखूचा संबंध आहे. भारतातील प्रदेश विचारात घेता, टीआरसीचे प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त असल्याचे आढळले आहे. या राज्यांनतर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड व छत्तीसगड यांचा क्रमांक लागतो.
कंपनीने या औषधाविषयी माहिती देताना म्हटले की, स्वर्णसाथीमध्ये सर्व नैसर्गिक घटक असून हे घटक अतिशय परिणामकारक हळद, टॉमेटो आणि मिरी यापासून बनवले आहेत. त्यामुळे ओरल सब मुकोसिस फायब्रॉसिसचा म्हणजेच माउथ प्री-कॅन्सरस टप्प्याशी सामना करण्यासाठी या औषधाची मदत होणार आहे. शिवाय, रूग्णाची प्रतिकारक्षमता या औषधामुळे वाढते, असा दावा कंपनीने केला आहे. कार्सिनोजेन्स, दैनंदिन सूज, अन्नातील बदल, केमिकल टॉक्सिन, प्रदूषके, मायक्रो-ऑरगॅनिझम, मुक्त रॅडिकल, कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक यांच्यापासून संरक्षण कवच मिळू शकेल. हळदीचे विविध आजरांवर गुणकारी आहे. तिच्यातील औषधी गुणधर्म हजारो वर्षांपासून उपचारासाठी उपयोगात आणले जात आहेत. कॅन्सरचा प्रतिबंध आणि उपचार म्हणूनच हळद वापरली गेली आहे. हळदीमुळे कॅन्सरवर फायदा होण्यासाठी दररोज किमान २.५ ते ५ टेबलस्पून हळद खाणे गरजेचे आहे आणि ते प्रत्यक्षात शक्य नाही. हळदीतील कर्युमिनॉइड्स सेवन करण्याचा एक तोटा म्हणजे कक्र्युमिन हा सक्रिय घटक त्याचे फायदे देण्यासाठी रक्तामध्ये मिसळत नाही. स्वर्णसाथी या उणिवांवर मात करते. त्यासाठी कर्युमिनॉइड्स उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच पूर्णतः नैसर्गिक हळदही उपलब्ध आहे. दररोज पुरेसा डोस घेण्यासाठी केवळ १-२ सॅशे घेता येतो. हे उत्पादन जगभर प्रथमच दाखल करण्यात आले असून ते सर्व वयोगटांतील प्रौढांना उपयोगी ठरू शकते.