आरोग्यनामा ऑनलाइन टीम – साखरेच्या पदार्थांमुळे शरीरात कॅल्शियमच्या कमतरता निर्माण होते. वयस्कर व्यक्तींसह तरुणांमध्येही ही समस्या दिसून येते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच ब्लड सेल्स तयार होतात. कॅल्शियमसाठी दूध, चीज, बटर, पनीरचे सेवन केले जाते. परंतु, या पदार्थांशिवाय कॅल्शियमची कमतरता दूर करणारे अन्य काही पदार्थ आहेत. काही लहान मुलांना दूध आवडत नाही, अशा मुलांना हे पदार्थ दिल्यास त्यांच्यातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊ शकते.
हे पदार्थ सेवन करा
* अंजीरमध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते.
* ओटमील खाल्ल्याने फायबर आणि कॅल्शियम दोन्हीही मिळते. महिलांनी हे ब्रेकफास्टमध्ये आवश्य खावे.
* सारडाइन हा समुद्रातील एक मासा आहे. ज्यामध्ये ३३ टक्के कॅल्शियम असते. आठवड्यातून १ वेळा त्याचे सेवन जरूर करावे.
* बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते. सोबतच यामध्ये अन्य पोषकतत्त्वही असतात.
* संत्री आणि लिंबूचे सेवन आठवड्यातून दोनदा अवश्य करावे.
* एक चमचा तिळ खाणे म्हणजे एक ग्लास दूध पिण्यासारखेच आहे.
* सोया मिल्कच्या एक ग्लास दूधाने ३०० एमजी कॅल्शियम मिळते.
* चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
* एक वाटी भेंडीतून ४० ग्राम कॅल्शियम मिळते.