आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोणताही मोठा आजार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. आपल्याला त्या आजाराबाबत जास्त काही माहित नसल्यामुळे आपल्याला डॉक्टरांनाच देव मानावे लागते. पण सध्या अनेक मोठमोठ्या दवाखान्यात रुग्णाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा योग्य ते उपचार न दिल्याने रुग्ण दगावतात. यावर नातेवाईकांनी कितीही आरडा-ओरडा केला तर त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. परंतु, आता मात्र आता अशा डॉक्टरला कायद्याच्या कक्षेत राहुन धडा शिकवता येणार आहे. कारण आता आपण डॉक्टर, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि हेल्थ सेंटर विरुद्ध केस करू शकतो.
या पार्श्वभूमीवर डॉक्टर, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि हेल्थ सेंटरवर केस करताना आपल्या समोर गुन्हेगारी आणि नागरी असे दोन पर्याय आहेत. त्यातील गुन्हेगारी प्रकरणात डॉक्टरला तुरुगांत टाकले जाऊ शकते. तर नागरी प्रकारे तक्रार केली तर न्यायालय आपल्याला भरपाई देऊ शकते. अशा तक्रारींमध्ये न्यायालय हे रुणाच्या बाजूने जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान डॉक्टरांविरुद्ध गुन्हेगारी पद्धतीची तक्रार केली. तर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०४-ए, ३३७ आणि ३३८ ची तरतूद करण्यात आली आहे. यात डॉक्टरांना ६ महिने ते २ वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते. तर सिव्हिल केस डॉक्टर हॉस्पिटल, हेल्थ सेंटर आणि नर्सिंग होम विरूद्धही करता येते. याव्यतिरिक्त ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक फोरममध्ये चांगला मोबदला मिळू शकतो.