आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ऊन हे आरोग्य आणि उत्साहासाठी पुरक असते. सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी तयार होण्याची क्रिया वेगाने होते. व्हिटॅमिन डीमुळे अनेक आजारापासून सुटका मिळते. सूर्यप्रकाशाची किरणे ही निसर्गाचे वरदान असून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे असते. शरीरात व्हिटॅमिन डी योग्य पद्धतीने कार्यरत राहावे यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो. शरीरात व्हिटॅमिन डी सक्रिय झाल्याने चयापचय प्रक्रिया सुधारते. तसेच अनेक आजारांचा सामना करण्याची शक्ती मिळते.
किती असते गरज
४०० इंटरनॅशनल युनिट(आययू) व्हिटॅमिन डी ची एका सामान्य व्यक्तीला दिवसभरात गरज असते. ८० टक्के भारतीय पुरुष, महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते.
५८ टक्के भारतीयांना वाटते की व्हिटॅमिन डी आणि सूर्यकिरणांमध्ये काही तरी संबंध असतो.
सूर्यप्रकाशाची गरज
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास स्तन आणि मोठय़ा आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. सूर्यप्रकाश यापासून रक्षण करतो. आहारातून आपण जे व्हिटॅमिन डी घेतो ते योग्यपद्धतीने शोषले जाण्यासाठी ऊन आवश्यक असते.
स्मृतिभ्रंश
दिवसभर काही प्रमाणात उन्हात राहणे अल्झायमरमध्ये फरक पडतो. उन्हात फिरल्याने अल्झायमर पीडितांना झोप न येणे, आळस, मळमळ असा त्रास होत नाही.
हाडांचे आजार
लहान मुलांचे कमकुवत हाडांच्या आजारापासून रक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन डीचा आहार घेण्यापेक्षा उन्हात बसणे जास्त फायदेशीर आहे.
ऊन किती गरजेचे
हंगामानुसार शरीराला उन्हाची गरज कमी जास्त होते. दिवसात १० मिनिटे थेट उन्हाच्या संपर्कात राहिले पाहिजे. वय वाढण्यासोबत याचे प्रमाणदेखील वाढते. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतची सूर्यकिरणे हानिकारक असतात. ही वेळ वगळता इतरवेळी उन्हात बसावे.