आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चुकीच्या आहारामुळे पचनक्रियेत अनेक अडथळे येतात. यामुळे गॅस होणे, अॅसिडीटी आदी समस्या जाणवतात. अलिकडे गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या जास्त वाढल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या समस्या तरूणांनाही जाणवत आहेत. खाण्या पिण्याच्या वाईट सवयी हे यामागील प्रमुख कारण आहे. आपल्या आहारातून पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ दूर केल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. गॅसची समस्या टाळण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या असू नयेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
हे पदार्थ खावेत
१ अद्रक
२ पुदीना
३ कोथेंबिर
४ ज्वारीची भाकरी
५ ओट्स
६ काकडी
७ ताज्या फळांचा ज्यूस
हे पदार्थ खावू नयेत
१ लसूण
२ कांदा
३ गव्हाची चपाती
४ कोबी
५ फ्लॉवर
६ थंड पेय