आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झोप पूर्ण मिळत नसल्यास स्वभाव चिडचिडा होतो. ही समस्या जाणवत असल्यास काही जण झोपेच्या गोळ्या घेतात. पण ठराविक काळानंतर गोळ्यांचाही शरीरावर काहीही परिणाम होत नाही. झोपेची समस्या असल्यास पोषक द्रव्ये आहारात समाविष्ट करावीत. यामुळे चांगला फायदा होतो.
पोषक द्रव्ये आणि स्त्रोत
* व्हिटॅमिन बी-६ : यामुळे तणाव कमी होतो आणि नव्र्हस सिस्टिमही रिलॅक्स होते. हे काजू, दही, लोणी, बदाम, टोमॅटो, रताळे यामध्ये मिळते.
* कॅल्शियम : चांगली झोप आणि शरीराला रिलॅक्स करण्यात कॅल्शियम सहायक आहे. याच्या कमतरतेने रक्तदाब अनियंत्रित होण्याची समस्या उद्भवू शकते. हे हिरव्या पालेभाज्या, दही, बदाम, दूध, ब्रोकोलीमधून मिळते.
* ओमेगा ३ फॅटी अॅसिड : यामुळे तणाव कमी होऊन शरीर रिलॅक्स होते आणि झोपही येते. हे सॉलमन फिश, अंडी, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यातून मिळते.
* प्रोटीन : यामुळे कोलेस्टेरॉल आणि झोपेची समस्या दूर होते. तसेच ब्लड शुगर लेव्हलही संतुलित राहते. हे अंडी, केळी, नट्स, दही, हिरव्या भाज्या, सीफूड यामध्ये मिळते.
* लोह : याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे आणि इंसोमेनियाचा त्रास होऊ शकतो. हे ब्रोकोली, शेंगभाज्या, मटण यातून मिळते.
* मॅग्निशियम : यामुळे झोप न येण्याच्या समस्येसह उच्च् रक्तदाब आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.
यात मिळेल सीड्स, शेंगभाज्या, गाजर, हिरव्या पालेभाज्या, धान्य, डार्क चॉकलेट, केळी इत्यादी.
* पोटॅशियम : यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन बनते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहून झोप येण्यास मदत होते.
यात मिळेल : फळे, सुका मेवा, काकडी, टोमॅटो, ओट्स, दही.