आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पांढरे केस लपवण्यासाठी आपण हेअर डाय लावत असतो. यामुळे केसांना सुंदरता तर येतेच पण यामुळे कधी कधी ॲलर्जी होते. यामुळे त्वचेवर लाल निशाण, फोड येणे, रॅशेस होणे या प्रकारचे त्रास होऊ शकता. या हेअर डायमध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे हा त्रास होतो. हेअर डायमुळे त्वचेला होणाऱ्या ॲलर्जीपासून वाचण्यासाठी जाणून घेऊ काही घरगुती उपाय.
कोरफड
कोरफड हे त्वचेसाठी खूप उत्तम असते. त्वचेच्या अनेक समस्यांवर हे फायदेमंद मानले जाते. कोरफडमध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल तत्त्वामुळे त्वचेचे आजार दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. ॲलर्जी झालेल्या भागावर जर सूज आली असेल आणि खाज येत असल्यास याठिकाणी कोरफडीचा गर लावावा.
टी-ट्री ऑयल
हेअर डायमूळे ॲलर्जी झाल्यास त्याठिकाणी टी-ट्री ऑयीलचा वापर फायदेमंद ठरू शकतो. टी-ट्री ऑयील मध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल गुणामुळे ॲलर्जी झालेल्या भागात लावून हलका मालिश केल्याने त्वचेवर झालेले लाल चटे, रॅशेस कमी होतात.
कडुलिंब
कडुलिंबाच्या पानात अँटीबॅक्टेरियलबॅक्टेरियल गुणामुळे त्वचे संबंधी समस्या दूर करण्यात फायदेमंद असते. हेअर डाय नंतर त्वचेवर ॲलर्जी झाल्यास कडुलिंबाचे पाने ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावा आणि नंतर याचा पेस्ट तयार करून ॲलर्जी झालेल्या त्वचेवर लावावा.
दही आणि लिंबू
लिंबू मध्ये अँटीबॅक्टेरियल सेप्टिक आणि अॅस्ट्रिंजेंट गुण असल्याने त्वचेवरील ॲलर्जी दूर करण्यात मदत करते. हेअर डायनंतर त्वचेवर खाज होत असल्यात त्यावर लिंबू आणि दही मिळसून लावावा आणि २० मिनिटांनी केस स्वच्छ धुवून काढावा.