पोलीसनामा ऑनलाइन टीम – बटाट्याचे जास्त सेवन केल्यास वजन वाढते एवढेच माहित असल्याने अनेकजण बटाटा खाण्याचे टाळतात. मात्र, बटाट्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. बटाटा भाजी ही भारतात सर्वाधिक लोकप्रीय आहे. अनेक खाद्यपदार्थांसोबत बटाट्याची भाजी खाल्ली जाते. शिवाय बटाट्यापासून असंख्य खाद्यपदार्थ तयार केले जातात. काही खाद्यापदार्थ तर असे आहेत की, बटाट्याशिवाय ते तयारच होऊ शकत नाहीत. बटाट्यामुळे वजन वाढते ही भिती बाजूला ठेवून योग्यप्रमाणात बटाट्याचे सेवन केल्यास त्याचा फायदाच होऊ शकतो. बटाट्याच्या सेवनाने अनेक आजार दूर ठेवता येऊ शकतात.
एका बटाट्यात ८ टक्के फायबर असते. संशोधनानुसार फायबरमुळे कोलेस्टेरॉल कमी होते. एका बटाट्यात रोजच्या गरजेपैकी ८ टक्के लोह असते. त्यामुळे रक्त वाढण्यात बटाटा उपयोगी ठरतो. तसेच बटाटा पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळ्यापेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशियम असते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून दररोज शरीराची १८ टक्के पोटॅशियमची गरज भागवली जाऊ शकते. तसेच बटाट्यातील पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बटाट्यात दररोजच्या गरजेपैकी ४५ टक्के व्हिटॅमिन्स सी आढळते. एवढे व्हिटॅमिन सी एक साधारण आकाराच्या टोमॅटोमध्ये आढळते. व्हिटॅमिन सी जखम लवकर बरी होण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे हिरड्यादेखील मजबूत राहतात. वजन वाढवायचे असल्यास बटाटा एक चांगला पर्याय आहे. यात मुबलक प्रमाणात काबरेहायड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन वाढवण्यात मदत होते. तसेच काबरेहायड्रेट्स जास्त असल्याने बटाटा लवकर पचतो.
मेंदूचे कार्य योग्य पद्धतीने आणि जलद होण्यासाठी योग्य प्रमाणात ग्लुकोज, ऑक्सीजन आणि व्हिटॅमिन्स बीची शरीराला गरज असते. बटाट्यातून या गोष्टींची पूर्तता होऊ शकते. तसेच पोटातील आग कमी करण्यासाठी बटाटा अत्यंत उपयुक्त असतो. यात असणारे अँटीऑक्सीडंट्स आतडे आणि पचन प्रणालीतील आग कमी करतात. बटाट्यात ८० टक्के पाणी असते तर उर्वरित भाग हा सॉलिड असतो. एका साधारण आकाराच्या बटाट्यात ११० कॅलरी असतात. फॅट, कोलेस्टेरॉल आणि सोडियम अजिबात नसते. बटाटा फक्त चविष्टच नसून ही बहुगुणी अशी भाजी आहे. यातील अनेक औषधी गुणधर्म आजारापासून वाचवतात.
‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे
‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व
स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा