आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Piles Causing Foods | माणसाला अनेक छोटे मोठे आजार होत असतात. मात्र मुळव्याध (Piles) हा एक असा आजार आहे की माणसाच्या जीवाचे हाल होते. अवघड जाग्याचं दुखणं म्हणजे मुळव्याध आहे. हा आजार मागे लागला तर माणसाला काहीही सुधरत नाही. हे दुखणं बसताना आणि चालताना माणसाला त्रास करतो. संडासच्या जागी हा त्रास होत असतो. या आजाराचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. यावर उपाय (Piles Causing Foods) करणे अवघड जातेय.
विशेष म्हणजे खाण्या पिण्याचा परिणाम देखील यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपण खाण्या पिण्यावर लक्ष देणे फार महत्वाचे आहे. काही गोष्टी आहारापासून बाजूला केल्या पाहिजेत यामुळे भविष्यात त्रास होत नाही. खरंतर मूळव्याधीसाठी औषधोपचार (Medication) अथवा शस्त्रक्रिया (Surgery) असे 2 उपाय असतात. पण, हा त्रास होऊच नये म्हणून खाण्यापिण्यावर काय बंधणे आणावी? याबाबत जाणून घ्या. (Piles Causing Foods)
1. तळलेले आणि फास्ट फूड (Fried And Fast Food) –
तळलेले आणि फास्ट फूड यामध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि जास्त प्रमाणात फॅटस (Fats) असतात. त्यामुळे मूळव्याध सारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. इतकेच नाही तर या पदार्थांमुळे आरोग्याच्या इतरही समस्या वाढतात. त्यामुळे फास्टफूडपेक्षा सॅलेड, फळं यांसारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खायला हव्यात.
2. अल्कोहोल (Alcohol) –
अल्कोहोलचे व्यसन हे अजिबात चांगले नाही हे आपल्या सगळ्यांना माहित असते. तरीही कधी मित्रमंडळींसोबतची मजा म्हणून किंवा कधी नशा म्हणून आपण त्याचे सेवन करत राहतो. मात्र एकदा त्याची सवय लागली की आपल्याला ते नियमित घेण्याची इच्छा होते आणि आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत राहतात. अल्कोहोलच्या सेवनाने डिहायड्रेशन (Dehydration) होते आणि त्यामुळे पोट साफ होण्यातही अडचणी येतात.
3. ग्लूटेन असलेले पदार्थ (Foods Containing Gluten) –
ग्लुटेन असलेल्या पदार्थांमुळे मूळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता असते. आपण नियमित खात असलेल्या गव्हात ग्लुटेनचे प्रमाण (Gluten Level) जास्त असते. याशिवाय मैदा किंवा अन्य काही धान्यांमध्येही ग्लुटेन जास्त प्रमाणात असते. ग्लुटेन हे एकप्रकारचे प्रोटीन असून पचनशक्ती कमी करण्याचे काम या प्रोटीनव्दारे केले जाते. त्यामुळे कमीत कमी ग्लुटेन असलेले पदार्थ आहारात असायला हवेत.
4. गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Cow’s Milk And Dairy Products) –
काही लोकांना गायीचे दूध किंवा त्यापासून तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ यांमुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते.
गायीच्या दुधात असणारे प्रोटीन्स मूळव्याधीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळे गायीच्या दुधाऐवजी सोया मिल्कचा पर्याय उत्तम ठरु शकतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Piles Causing Foods | foods that cause piles or hemorrhoids know foods to avoid to prevent constipation
Women Health | गर्भपातानंतर येणारी ‘मासिक पाळी’ किती दिवस सुरू राहते?; जाणून घ्या