आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्वयंपाकघरात कांदा हा सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा पदार्थ आहे. शाकाहारी पदार्थ असो किंवा मांसाहारी पदार्थ कांदा सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी-6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याशिवाय कांद्यामध्ये आयर्न आणि पोटॅशिअमदेखील असतात.
कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोशिंबीरी बनवण्यासाठी कच्चा कांदा वापरला जातो. याशिवाय बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. मात्र कच्चा कांदा खाणे सर्वाच्याच आरोग्यासाठी इष्ट नाही. लिव्हरच्या समस्यांनी ग्रस्त लोकांनी आणि ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता अशा लोकांनी कच्चा कांदा आहारातून वर्ज्य करावा. जाणून घ्या या रुग्णांच्या आरोग्यावर कच्चा कांदा खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम –
१) यकृताच्या (लिव्हर) समस्येने ग्रस्त व्यक्ती-
यकृताच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने कधीही कच्चा कांदा खाऊ नये. कारण कच्चा कांदा सेवन केल्याने यकृताची समस्या आणखी वाढते, म्हणून यकृताची समस्या उद्भवल्यास कच्चा कांदा कधीही खाऊ नये.
२) अशक्तपणा –
ज्या लोकांच्या शरीरात अशक्तपणा असतो त्यांनी कधीही कच्चा कांदा खाऊ नये. शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तर कच्चा कांदा कधीही खाऊ नये कारण अशक्तपणा असताना कच्चा कांदा खाल्ला तर रक्ताची कमतरता आणखी वाढते, म्हणून रक्ताची कमतरता असल्यास कच्चा कांदा कधीही खाऊ नये.