आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपई खाल्याने आपले अनेक आजार नियंत्रणात येतात. तसेच पपई आपल्या त्वचेसाठी ही खूप फायदेशीर आहे. पण पपईचं नाही तर पपईचे पानेही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या डेंग्यूची साथ चालू आहे. त्यामुळे डेंगू नियंत्रणात आणण्यासाठी आपण काही घरगुती उपचारही करू शकतो. त्यामुळे पपईचे पानाचा उपयोग करून आपण आपला डेंगू कसा नियंत्रणात आणायचा हे आपण आज जाणून घेऊ.
पपईच्या पानांमध्ये काही महत्त्त्वपूर्ण एंजाईम्स आढळतात. या पानांमुळे रक्त साखळून न राहता प्रवाही होते. तसेच रक्तातील प्लेट्स काऊंट वाढवतात व डेंग्यूमध्ये होणारे यकृताचे नुकसान टाळून त्याची कार्यक्षमता वाढवतात.
यासाठी तुम्ही पपईची कोवळी पानं खुडून घ्या. त्याचे देठ काढून पानं स्वच्छ धुवून घ्या. ही पाने वाटून त्याची पेस्ट करा. या मिश्रणामध्ये पाणी, मीठ व साखर मिसळू नका. यानंतर ८ तासांच्या अंतराने हा रस दिवसातून दोनदा प्या. असं केल्यास तुमचा डेंगू लवकर नियंत्रणात येईल.
प्रणाम –
५-१२ वयोगटातील मुलांसाठी ५ मिली दिवसातून दोनदा घ्या. १० वर्षांखालील मुलांसाठी २.५ मिली घ्या आणि मध्यमावयीन लोकांसाठी १० मिली दिवसातून दोनदा घ्या. परंतु, जेव्हा तुम्हाच्या डेंगू या आजाराचे निदान होईल. तेव्हाच हा रस घ्या.