आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कधी-कधी काही चांगल्या सवयी सुद्धा त्रासदायक ठरू शकतात. कारण या चांगल्या सवयींचा अतिरेक केल्यास त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागतात. चांगल्या सवयी जास्त अंगी बाळगल्याने फायद्याऐवजी नुकसानच होते. अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यांचा अतिरेक करू नये, हे आपण समजून घेणार आहोत.
सॅनिटायझर
जंतू नष्ट करण्यासाठी हँड सॅनिटायजर वापरणे फायदेशीर आहे. परंतु याचा जास्त वापर करणे चांगले नाही. याचा अतिवापर केल्याने जंतुंनाही याची सवय होऊन जाते आणि त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. यामुळे संक्रमण होऊ शकते. त्वचा देखील खराब होऊ शकते.
स्मूदीचे सेवन
स्मूदीचे सेवन करणे चांगले असले तरी गरजेनुसार सेवन करावे. दिवसातून फक्त एक ग्लासच सेवन करावे. स्मूदी प्यायल्याने आतड्यामध्ये गॅसची समस्या होऊ शकते. यामध्ये जास्त फायबर असते जास्त फायबरचे सेवन केल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर यापासून दूर राहा.
जास्त वर्कआउट
फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. परंतु गरजेपेक्षा जास्त एक्ससाइज केल्याने दुष्परिणाम होऊ शकतो. जास्त वर्कआउट केल्याने टिशुंवर दुष्परिणाम होतो. नियमित व्यायाम करत असाल तर आठवड्यातुन एक दिवस आराम द्या. हे शरीरासाठी खुप आवश्यक असते.
पाण्याचे जास्त सेवन
पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते परंतु पाण्याचे सेवन जास्त केल्याने शरीराला धोका पोहोचू शकतो. यामुळे शरीरातील तरल पदार्थ अधीक पातळ होतात आणि सोडियमचे प्रमाण कमी होते. सेल्सवर सुज येते आणि कोमामध्येही जाऊ शकता. यामुळे वय, वजन आणि डायट प्रमाणेच पाणी प्यावे.
दात घासणे
दात स्वच्छ करणे खुप आवश्यक असून योग्य पध्दतीने ब्रश करावा. दात जास्त चमकवण्यासाठी खुप जोरात दात घासत असाल तर हिरड्या आणि एनामेल खराब होऊ शकते आणि यामधून रक्त येऊ शकते.
सुखामेव्याचे सेवन
हृदयाचे आजार आणि वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुखामेवा फायदेशीर आहे यामुळे वजनही वाढते. परंतु जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे जास्त प्रमाणात सेवन करु नका.