हॉर्मोन्स असंतुलन हे एक महत्त्वाचे वजन वाढण्याचे कारण आहे . कधी कधी हॉर्मोन्स जास्त वाढल्याने किंवा कमी झाल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. याला हॉर्मोन इंबॅलेन्सही म्हणतात. अशा हॉर्मोन इंबॅलेन्सवेळी कमी झोप येणे, तणाव वाटणे आणि चिडचिड जास्त प्रमाणात होते .
२. टीव्ही पाहत जेवणे
भरपूर लोकांना टीव्ही पाहत जेवण करण्याची सवय असते. पण या सवयीमुळे आपण किती प्रमाणात जेवण घेत आहे याकडे लक्ष देत नाही. तर ही सवय आधी बंद करावी. जेवत असताना नेहमी हळू हळू आणि नीट चावून खावे.
३. कमी झोप
प्रत्येक व्यक्तीसाठी कमीत कमी ८ तासाची झोप गरजेची असते. पण आपल्या नियमित कामामुळे आपण पूर्ण झोप घेऊ शतक नाही तर कधी कधी टीव्ही आणि मोबाईल मुळे झोप पूर्ण होत नाही. पण वजन वाढण्यामागे हे देखील एक कारण होऊ शकते.
४. वेळेवर नाष्टा न करणे
घाईत आपण नेहमी नाष्टा नाही करत. पण आपल्या हे लक्षात येत नाही की वजन वाढी मागे हे देखील एक कारण होऊ शकते. तर नियमित आरोग्यदायी नाष्टा घेणे खूप गरजेचे आहे.
५. सकाळी पाणी न पिणे
खूप लोकांना सकाळी बेड-टी पिण्याची सवय असते. पण हे चुकीचे आहे. कारण रिकाम्या पोटी पाणी न पिल्याने पोट साफ होत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकते. यामुळे सकाळी उठल्या नंतर १ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
६.व्यायाम न करणे
वजन वाढण्यामागील एक कारण म्हणजे व्यायाम न करणे. व्यायाम केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. म्हणून नियमित किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे.
७. अधिक ताण घेणे
ज्यास्त ताण घेतल्यानेही वजन वाढू शकते. जास्त ताण घेतल्याने स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि यामुळे आपले वजन वाढू शकते. जर वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर जास्त ताण घेऊ नये.
८. गरजे पेक्षा जास्त औषध घेणे
आजारी असताना औषध घेणे योग्य आहे. परंतु लहान सहन गोष्टीसाठी नियमित औषध घेणेही वजन वाढीचे कारण बनू शकते.