आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लग्नामध्ये मुलींना सुंदर दिसायचे असल्याने त्या प्री ब्रायडल पॅकेज घेतात. यामुळे मुलींचे सौंदर्य उजळते. परंतु अनेक मुलींना लग्नापुर्वी त्वचेवर कोणते उपचार करावेत हे माहित नसते. लग्नापुर्वी चुकूनही त्वचेसंबंधी काही गोष्टी करू नयेत. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात.
सलून फेशियल
प्री ब्रायडल स्किनसाठी सलून फेशियल अजिबात चांगले नाही. याचा त्वचेवर उलटा परिणाम होऊ शकतो. यामुळे स्किनमध्ये इरिटेशन, अॅलर्जी आणि पिंपल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ४७ टक्के एशियन महिलांना फेशियल केल्याच्या ७-२१ दिवसांनंतर पिंपल्स होतात. कारण सलून फेशियलमध्ये ८-१० प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. यामध्ये १०० प्रकारचे पदार्थ असतात.
घरगुती उपाय
अनेक मुली लग्नापुर्वी घरगुती उपाय करुन स्किन उजळ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या त्वचेला काय सुट होते हे त्यांना माहिती नसते. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
फेस पील
लग्नाच्या काही दिवसपुर्वी पीलचा वापर करणे टाळावे. स्किन पील लावल्यानंतर काय रिअॅक्शन असेल हे माहिती असावे. ज्या महिला पील करतात त्यांच्या त्वचेवर मेकअप योग्य प्रकारे सेट होत नाही.
बिकनी व्हॅक्सिंग
लग्नापुर्वी बिकनी व्हॅक्सिंग करायची असेल तर तीन महिने अगोदर करा. लग्नाच्या २ दिवसांपुर्वी करु नका. व्हॅक्सिंग केल्याने त्या ठिकाणी खुप वेदना होतात. अनेक लोकांना रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
जास्त सोडियम
मीठ, सॉस असे पदार्थ खाणे टाळावे. याऐवजी लो कॅलरी पदार्थ खावेत. लग्नाच्या ७ दिवसांपुर्वी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे. सोडियमुळे तुमचे ५० टक्के वजन वाढू शकते.