आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लिव्हर म्हणजेच यकृत हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे पाचशे महत्त्वाची कार्ये व एक हजार विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. स्मोकिंग, अल्कोहल, तणाव आणि जंकफूडमुळे लिव्हरवर ताण पडतो. वाईट सवयी आणि व्यसनांमुळे लिव्हरच्या आजाराने अनेक जाण त्रस्त असतात. लिव्हर निरोगी राहण्यासाठी सहा घरगुती सोपे उपाय आहेत. या उपायांची माहिती आपण घेणार आहोत.
हळद
हळदीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असल्याने लिव्हरचे आरोग्य चांगले राहते. हळदीमधील अँटीव्हायरल अॅक्शन हेपेटायटिस बी आणि सी हे व्हायरस रोखण्यात सक्षम आहेत. स्वयंपाकात हळद वापरावी किंवा दुधामध्ये चिमुटभर हळद टाकून दररोज हे दुध प्यावे. यामुळे लिव्हरशी संबंधित रोगांना दूर ठेवता येते.
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे, कारण हा लिव्हरचे कार्य उच्च स्तरावर ठेवतो. आवळ्यातील तत्वांमध्ये लिव्हरचे संरक्षण करण्याचे गुण असतात. रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. पचन शक्ती वाढते. आवळा मुरब्बा करून नियमित खाऊ शकता.
जेष्ठमध
जे लोक नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर रोगाने त्रस्त असतात त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रांसएमायनेज एंझाइम्स एएलटी आणि एएसटीचे प्रमाण वाढते. जेष्ठमधातील तत्व या एंझाइम्सचे प्रमाण कमी करते. यामुळे जेष्ठमध लिव्हरसाठी लाभदायक आहे. आयुर्वेदामध्ये याचा वापर लिव्हरचे आजार बरे करण्यासाठी केला जातो.
गुळवेल
गुळवेलीमुळे लिव्हरचे कार्य चांगले होते. लिव्हरमुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल उपयुक्त आहे. तुळशीप्रमाणेच गुळवेलही बागेत लावून दररोज गुळवेलीची ताजी ४-६ पाने चावून खावीत.
जवस
जवसाच्या बियांमध्ये साइटोकॉन्सटीट्यूएंट्स असतात. यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखतात. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे.
भाज्या
काही भाज्यांमधील तत्व लिव्हरमध्ये आवश्यक असलेले एंझाइम्स स्रवीत करण्यास मदत करतात. हे एंझाइम्स कार्सिनोजेन्सला शरीरातून बाहेर काढतात. बीट, पत्ताकोबी, गाजर, ब्रोकली, कांदा आणि लसुन लिव्हरसाठी लाभदायक भाज्या आहेत.