आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. लहान मुलं तर तासनतास मोबाईलमध्ये गेम खेळत असतात. पालकही त्यांना मोबाईल देताना विचार करत नाहीत. पण तासनतास मोबाईलचा वापर करणे हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे लहान मुलांनी जर जास्त वेळ मोबाईल वापरला तर त्यांच्या आरोग्यास काय नुकसान होते ते जाणून घ्या.
१) मुलांनी जर मोबाईलचा सतत वापर केला तर त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. त्यातच त्यांना जर चष्मा असेल तर त्याचा नंबर अजनू वाढतो आणि चष्मा नसेल तर चष्मा लागण्याचा संभव निर्माण होतो.
२) तसेच तुमच्या मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरी आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे मोबाईल शक्यतो हृदयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. रात्री झोपतेवेळी मोबाईल दूर अंतरावर ठेवणे नेहमी चांगले.
३) आपण जर मोबाईलमध्ये सारखे डोके घालून बसण्याने डोक्याला ताण येतो आणि त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. यामुळे डोके दुखते.
४) तसेच मोबाईलचा वापर करतेवेळी पाठीचा कणा नेहमी वाकत असल्यामुळे पाठदुखीचाही त्रास होण्याची शक्यता असते.