Low Weight | वजन कमी झाल्याने सुद्धा वाढू शकतात आनेक समस्या, ऑस्टियोपोरोसिस, अॅनीमियासह होऊ शकतात हे 5 रोग
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Low Weight | जर तुम्हाला वाटत असेल की जास्त वजन हे प्रत्येक समस्येचे कारण आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. वजन जास्त असणंच नाही तर कमी वजन असणं देखील अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. कमी वजन (Low Weight) म्हणजे निरोगी वजन श्रेणीपेक्षा कमी वजन असणे. काही लोक ज्यांचे वजन कमी असते ते नेहमी आजारी, अशक्त किंवा थकल्यासारखे वाटतात. कारण त्यांना त्यांच्या आहारातून सर्व पोषक तत्वे मिळू शकत नाहीत. एवढेच नाही तर केस गळणे, त्वचा कोरडी पडणे किंवा दातांच्या समस्या इत्यादींचाही त्यांना अनुभव येऊ शकतो. कमी वजनामुळे कोणते आजार होऊ शकतात? ते जाणून घेवूया (Problems of being underweight).
कमी वजनामुळे होऊ शकतात हे आजार
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, कमी वजन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याचे दुष्परिणाम किंवा लक्षणे जाणवत नाहीत, परंतु यामुळे काही आजार होऊ शकतात, जे खालीलप्रमाणे आहेत :
१. ऑस्टिओपोरोसिस :
असे मानले जाते की ज्या महिलांचे वजन कमी आहे त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो. या आजारात हाडे कमकुवत होतात आणि सहज तुटू शकतात.
२. अॅनीमिया :
व्यक्तीचे वजन कमी असणे आणि रक्ताचे प्रमाण कमी असणे, यास अॅनीमिया म्हणतात. यामुळे व्यक्तीला चक्कर येणे, डोकेदुखी किंवा थकवा यासारख्या समस्या होतात.
३. कमकुवत इम्युनिटी :
पुरेसे पोषक तत्व न मिळाल्याने शरीर पुरेशी ऊर्जा साठवू शकत नाही यामुळे वजन कमी होते.
त्यामुळे त्यांची रोगांशी लढण्याची इम्युनिटी कमी होते.
४. त्वचा, केस आणि दाताच्या समस्या :
जर एखाद्या व्यक्तीला पुरेसे पोषक द्रव्ये मिळत नसतील, तर यामुळे केस पातळ होणे,
कोरडी त्वचा किंवा दातांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
५. ग्रोथ प्रॉब्लेम :
तरुणांना ग्रोथ आणि निरोगी हाडांसाठी पुरेशा पोषक तत्वांची गरज असते.
कमी वजनामुळे पुरेशा कॅलरीज मिळत नाहीत त्यामुळे योग्य वाढ होऊ शकत नाही.
Web Title :- Low Weight | Weight loss can also lead to other problems, including osteoporosis, anemia and these 5 diseases
Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका
Amla Benefits | आवळ्याच्या पाण्याने कमी होतो लठ्ठपणा, डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते