आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काकडी, अद्रक, लेमन ज्यूस आणि पुदिना वापरून तयार केलेल्या एका खास पेयाने ७ दिवसांत ३ किलो वजन कमी होऊ शकते. घरीच्या घरी हे पेय बनविणे खुप सोपे आहे. एक काकडी, एक चमचा सोललेले अद्रक, एका लिंबाचा रस आणि २० ग्रॅम पुदिन्याची पाने, हे सर्व पाण्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून ज्यूस तयार करा. हा ज्यूस ७ ग्लास पाण्यामध्ये भरून रात्रभर ठेवून द्या. सकाळी उठताच हा ज्यूस प्या. तसेच तहान लागेल तेव्हा हा ज्यूस प्या. सात दिवस सलग हे प्यावे. या कालावधीत वजनही करून तपासा.
होतील हे फायदे
१) हे पाणी शरीराला डिटॉक्स करते.
२) मेटाबॉलिज्म वाढवते.
३) डायजेशन सुधारते.
४) बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
५) वजन कमी होऊ लागते.
* गरोदर महिला तसेच अल्सर, पाइल्सचा त्रास असलेल्यांनी हे पेय पिऊ नये.