लिपबाम खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाईन  टीम – मुलींच्या सौंदर्यात भर घालणारे अंग म्हणजे त्यांचे ओठ. ते आकर्षक व ग्लॉसी  दिसावे अशी सर्वच मुलींची इच्छा असते. यासाठी विविध लिप्स्टिक व लिपबाम सारख्या  प्रोडक्टसचा  वापर मुली करतात. या प्रसाधनांचा वापर करून ओठांची सुंदरता वाढत जरी असली तरीही, ओठ फाटणे , ओठांचा काळपटपणा ,ओठ कोरडे पडणे तसेच हेड्स येणे असे बरेच दुष्परिणाम दिसून येतात. या दुष्परिणामांना टाळण्यासाठी पुढील बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

१) वेगवेळ्या फ्रेगरेन्सस/सुगंधी लिपबामच्या वापराने हेड्स होतात म्हणून शक्यतो हे टाळावेच.

२) विविध फ्लेवर्स किंवा रंगरहित लिपबाम टाळणे अतिमहत्त्वाचे आहे कारण, यांत मेंथॉल जास्त प्रमाणात असते व ओठ फाटतात.

३) स्वस्त व क्वालिटी नसलेले लिपबाम टाळावेत.

४) बऱ्याचवेळा आपण बोटांनी लिपबाम लावत असतो आणि आपले हात अस्वच्छ असतात. त्यामुळे इन्फेक्शन  होऊन एलर्जी होण्याची दाट शक्यता असते.

५) विविध कलरफुल आणि सुगंधित लिपबाम ऐवजी पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. जेणेकरून ओठ मऊ व ओलसर राहतील.