आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस (Mesenteric lymphadenitis) म्हणजे काय? त्याबाबत आज आपण जाणून घेऊया. मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस पोटात होणाऱ्या लिम्फ नोड्सच्या सूजला म्हणतात. या रोगामुळे प्रभावित ज्या लिम्फ नोड्समध्ये सूज येते ती एका पडद्यामध्ये असते ज्यामुळे पोटातील अस्तर आतड्यांशी जोडले जाते. मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिसला ‘मेसेंट्रिक अॅडेनाइटिस’ (Mesenteric lymphadenitis) म्हणूनही ओळखले जाते.
थोडक्यात, लिम्फ नोड्स वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे असतात, परंतु जेव्हा सूज येते तेव्हा ते मोठे आणि संवेदनशील बनतात. पोटात वेदना होण्याचे कारण बहुतेकदा मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस असते. हा आजार मुले आणि पौगंडावस्थेत असणाऱ्यांना होणे हे सामान्य आहे.
मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिसची लक्षणे काय आहेत?
– पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला किंवा इतर भागामध्ये वेदना
– ताप
– मळमळ आणि उलट्या
– अतिसार
– आजारी असल्यासारखे वाटणे, ज्यास अस्वस्थता म्हटले जाते.
– वजन कमी होणे
मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस का होतो?
मेसेन्ट्रिक लिम्फॅडेनाइटिसमध्ये सूज येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, जसे की गॅस्ट्रोएन्टेरायटिस- ज्यास बहुधा पोटाचा फ्लू म्हणून संबोधले जाते. आपल्या शरीराच्या रोगाशी लढण्यासाठी लिम्फ नोड्स महत्वाची भूमिका निभावतात. ते आपल्या शरीरात पसरतात, जे विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक जीव नष्ट करतात. काही मुलांमध्ये मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिसच्या आधी किंवा त्या दरम्यान अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शन विकसित होते.
Mesenteric lymphadenitis चा उपचार कसा केला जातो?
मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिसचे बहुतेक रुग्ण कोणताही उपचार न घेता 1-4 आठवड्यांत स्वतः बरे होतात. या अवस्थेतून बरे झाल्यावर कोणत्याही प्रकारचा कायमस्वरुपी परिणाम होत नाही, त्याच्या उपचारात डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी अँटीबायोटिक्स औषधे देतात.
मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिसची लक्षणे कमी करण्यासाठीचे इतर उपाय
– आराम करणे
– उलट्या आणि अतिसारानंतर हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे
– पोट गरम करावे