आरोग्यनामा ऑनलाइन टीम – त्वचेचा प्रकार, आपल्या कामाचा प्रकार तसेच आपण किती प्रदूषण आणि धुळीच्या संपर्कात येतो, यावर शॉवर घेण्याची वेळ आवलंबून असते. रात्री शॉवर घेणारे म्हणतात, रात्रीच्या वेळी शॉवर घेतल्याने दिवसभराचा थकवा आणि दुर्गंधी दूर होते. तर सकाळी शॉवर घेणारे म्हणतात, रात्रभर घामाने त्रस्त झालेल्या शरीराला सकाळचा शॉवर आवश्यकच आहे. परंतु यामध्ये कोणाचे उत्तर बरोबर आहे? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
रात्री जास्त घाम येत असेल तर
रात्री झोपल्यानंतर जास्त घाम येतो, त्यांनी सकाळीच शॉवर घ्यावा. परंतु जे रात्री शॉवर घेऊन झोपतात आणि ज्यांना जास्त घाम येत नाही, अशा व्यक्तींनी सकाळी शॉवर घेणे आवश्यक नाही.
रात्रीच्या वेळी शॉवर
काहींना रात्रीच्या वेळी शॉवर घेणे अल्हाददायक आणि सहज वाटते. परंतु रात्रीच्या वेळी शॉवर घेणे शरीरातील तापमानात बदल करू शकते, यामुळे शरीराचा नैसर्गिक लय बाधित होऊ शकतो. झोप लागण्यात अडचण येऊ शकते, असे संशोधक सांगतात.
दिनचर्येचा विचार करा
शॉवर घेण्याचा निर्णय शरीर आणि दिनचर्येनुसार घ्यावा. परंतु जास्त वेळेस स्नान करण्यापासून दूर राहा. जास्त वेळेस स्नान केल्याने शरीरातील गुड बॅक्टिरिया नष्ट होऊ शकतात. यामुळे त्वचा संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
सकाळी शेव करता का?
सकाळी शेव करत असाल तर शॉवर घेताना किंवा घेतल्यानंतर शेव करू शकता. शॉवर घेतल्याने शेव मुलायम होते. त्यामुळे दररोज सकाळी शेव करणारांनी सकाळी शॉवर घेणे उत्तम आहे.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी सकाळी शॉवर घेणे जास्त फायदेशीर असते. यामुळे त्यांची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
सकाळी लवकर उठणे
सकाळी लवकर उठणारांनी सकाळीच शॉवर घेणे चांगले असते. परंतु स्नूझ बटनचा वापर करण्याची सवय असल्यास हा चांगला पर्याय नाही.