आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोहळाच्या सेवनाने शुक्रधातूला पोषक मिळतो. तर पित्तनाशक, रक्तदोष दूर करण्यासाठी आणि वातसंतुलनासाठी उत्तम असतो. ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने पित्तशमनास उत्तम असतो. तोच कोहळा काही दिवसांनी मध्यमी पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो. तर चला अजून घेऊ अशाच कोहळाचे औषध म्हणून कसा वापर होतो.
– डोके दुखणे मळमळणे, उलट्या होणे यासारखर त्रास होत असल्यास रोज सकाळी कोहळ्याचा ४-५ चमचे रस साखरेसह घेतल्यास त्रास कमी होतो.
-मूतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा ४-५ चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.
– कोहळ्याच्या रसात दोन चमचे आवळ्याचा रस मिसणून सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि नाकातून रक्त येणे, लघवीतून रक्त येणे या प्रकारचे त्रास कमी होतात.
– प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.