आरोग्यनामा ऑनलाईन टीम- गर्भाशय, मूत्राशय आणि छोट्या आतड्यांना आधार देणाऱ्या स्नायूला किगल स्नायू असे म्हटले जाते. बाळंतपणानंतर हे किगल स्नायू कमजोर झालेले असतात. ते पुन्हा मजबूत करण्यासाठी नियमितपणे ‘किगल ब्रिज’ व्यायाम केल्यास महिलांना त्याचा फायदा होतो.
हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा आणि गुडघ्यांना वाकवा. खांदे सरळ जमिनीला टेकवावे. कमरेला आणि नितंबाला वर उचला. आणि पेल्विक स्नायूला आत घ्या. आता शरीराची एका पुलासारखी स्थिती होते. नंतर ३-५ वेळा कंबर उचला आणि पेल्विकला सैल सोडून पुन्हा सुरुवातीच्या अवस्थेत यावे. ५ वेळा असे करावे. या व्यायामुळे पोट कमी होते. िदवसातून २ ते ३ वेळा हा व्यायाम करता येतो. या व्यायामामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच बाळंतपणानंतर महिलांमध्ये युरिनची समस्या निर्माण होते. हा व्यायाम केल्यास ही या समस्येमधून आराम मिळतो. दररोज हा व्यायाम केल्यास पेल्विक स्नायू मजबूत होऊन सतत येणाऱ्या युरिनची समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पेल्विक स्नायू मूळ आकारात येतात. बाळंतपणानंतर प्रजनन अंगाला मजबूत करण्यासाठी हा व्यायाम उपयोगी ठरतो. तसेच या व्यायामामुळे शरीराची ऊर्जा वेगाने वाढून शरीराची चपळता वाढते.
मात्र, बाळंतपणानंतर किगल व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अनेक शारीरिक हालचाली बाळांतपणानंतर तीन महिन्यांपर्यंत करता येत नाहीत. श्वास लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर हा व्यायाम करू नये. हा व्यायाम करण्यापूर्वी मूत्र विसर्जन करावे. युरिनरी ब्लॅडर भरलेले असल्यामुळे पेल्विक एिरया अशक्त होतो आणि युरिन इन्फेक्शन होऊ शकते.