पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भधारने दरम्यान महिलांना स्वतःच्या आणि होणाऱ्या बाळाच्या दोघांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी लागते. या काळात महिलांमध्ये प्रत्येक महिन्याला नवीन बदल होत असतात. त्यामुळे महिलांना अधिक काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे महिलांनी प्रसूतीच्या अगोदरच्या काळात जर व्यायाम केला. तर त्यांना प्रसूतीलाही त्रास होत नाही. आणि त्या महिलेचं आणि बाळाचं आरोग्य सुदृढ राहतं.
१) महिलांनी पहिल्या तीन महिन्यात उभ्याने करायची योगासने करावीत. कारण त्याने पायांना बळकटी मिळते, रक्ताभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणारे पेटके बंद होतात.
२) दुसऱ्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती महिलांनी आसने करण्याचा वेळ कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.
३) तसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठवड्यापासून ते चौदाव्या आठवड्यापर्यंत सराव करू नये. कारण हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणू नये. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. ओटीपोटावर अजिबात तणाव येऊ देऊ नये. उलटे होणे पूर्णपणे टाळावे.
योगाचा सराव तुम्हाला प्रसूतीसाठी मनाने आणि शरीराने तयार होण्यास मदत करतो. कारण योगामुळे तुम्ही केंद्रित होता. तुम्ही अविचल आणि निरोगी बनता. योगासने ही सौम्य पद्धती आहे. ती तुमच्या शरीराला कार्यशील आणि लवचिक ठेवते. सकाळी वांती होणे आणि बद्धकोष्ठता यासारखी सामान्य गर्भावस्थेतील लक्षणे योगामुळे कमी होतात. आणि प्रसूती सुसह्य होते.आणि गर्भाशय आणि गर्भनलिका यातील तणाव कमी करून आणि ओटीपोट उघडे करून बाळंतपण निर्विघ्नपणे पार पाडण्यात मदत होते.