आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आजारी पडल्यानंतर आपल्याकडे औषध घेण्याची पद्धत आहे. परंतु, आजार होऊच नये म्हणून काळजी घेतली जात नाही.असे अनेक आजार आहेत जे आपण योग्य काळजी घेतल्यास कधीही होणार नाहीत. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. शिवाय काही घरगुती पदार्थांचे नियमित सेवन केले तरी आरोग्य चांगले राहू शकते. काही भाज्या, फळे इतकी गुणकार आहेत की भलेभले आजार दूर राहू शकतात. शरीर सुखाचा आनंद वाढविण्यासाठी काहीजण व्हायग्रा घेतात. व्हायग्रा घेण्यापेक्षा आहारात काही फळ अथवा पालेभाज्यांचा नियमित समावेश केल्यास व्हायग्रा घेण्याची गरज भासणार नाही. तुम्ही व्हायग्रापेक्षा जास्त परफॉर्मन्स देऊ शकता. या भाज्या कोणत्या त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
लसनाप्रमाणे कांदासुद्धा आपल्या कामोद्दीपक गुणामुळे ओळखला जातो. सीमित प्रमाणात कांद्याचे नियमित सेवन केल्यास हा यौन अंगांचे आरोग्य वाढवून कामेच्छेमध्ये सुधार करू शकतो. लसणामध्ये आढळून येणारे अॅलीसन तत्त्व जननांगामध्ये रक्तप्रवाह वाढवते आणि ब्लड व्हेन्सला पसरवते. ज्यामुळे यौन क्षमता वाढते. अनेक भागांमध्ये लसणाची चटणी करून खाल्ली जाते. भेंडी सी व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत आहे. झिंकची कमतरता स्तंभन समस्यांमधील प्रमुख कारणांमधील एक आहे. हे तत्त्व थकवा दूर करून यौन शक्तीला पुन्हा पुनर्जीवित करते.तसेच मशरूममध्ये व्हिटॅमिन डी आढळून येते, हे तत्व सेक्स लाईफला मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. कारण व्हिटॅमिन डी चे सेवन केल्याने गुप्तांगपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि यामुळे सेक्स लाईफ वाढते. हिरव्यागार पालक भाजीमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे स्पर्मला मजबूत बनवते. नियमितपणे पालकाचे सेवन केल्यास सेक्स लाईफलासुद्धा फायदा होतो.
पालकाप्रमाणे ब्रोकोलीसुद्धा जननांगामध्ये रक्तप्रवाह वाढवून बेडर तुम्हाला उत्तम परफॉर्मर बनवते. टोमॅटोमध्ये आढळून येणारे लायकोपिन नावाचे अँटीऑक्सीडेन्ट एक नैसर्गिक कामेच्छा बूस्टर म्हणून ओळखले जाते. शीघ्रपतन किंवा कमजोरी नष्ट करून पौरुषत्व वाढवण्यामध्ये अत्यंत प्रभावी आहे. हे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आणि इरेक्टाइल डिसफंक्शनच्या लक्षणांमध्ये सुधार करण्यास मदत करते. बीट ही भाजी बेडवर तुमच्यासाठी चमत्कार ठरू शकते. बीटमध्ये नायटेटचे प्रमाण भरपूर असते, जे जननांगपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करते. यामध्ये असलेले पोषक तत्व नैसर्गिक रूपात शरीराला डिटॉक्स करतात आणि हार्मोनल संतुलन कायम ठेवण्यास सहायक ठरतात. या कारणामुळे बीट बेडवर तुमचा परफॉर्मन्स वाढवू शकते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळून येते. सेक्स आणि व्हिटॅमिन्सचा खूप घनिष्ट संबंध आहे. संभोगाच्या काही काळापूर्वी एक गाजर चावून-चावून खाल्ल्यास तुमचा परफॉर्मन्स निश्चितच वाढेल. गाजरामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन ए वीर्य आणि पौरुषत्व वाढवते. या भाज्यांचे नियमित आहारामध्ये घेतल्यास व्हायग्रा घेण्याची गरजच भासणार नाही. यामुळे शरीरसुखाचा भरपूर आनंद घेता येईल.