आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या पडल्या की, सगळेजण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. वाढत्या उन्हात जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्याला बाहेर फिरायला जायचे असेल तर आपले आरोग्य देखील चांगले असणे गरजेचे आहे. प्रवासदरम्यान आपण कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया……
उन्हाळ्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे शरीराचे डिहायड्रेशन ! दिवसभरात कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी पिल्यास डिहायड्रेशन धोका टाळता येऊ शकतो. प्रत्येक तासाला जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय लिंबू सरबताचे सेवनही करावे. प्रवासादरम्यान आपल्याकडे पाण्याची बाटली असणे गरजेचे आहे.
शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडणे टाळा. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी फिरण्याचे नियोजन करणे योग्य. फिरायला जायचे नियोजन एकदिवस आधीच करा.
बाहेर फिरायला जाताना नेहमी सनस्क्रिन लावल्याशिवाय बाहेर पडू नये. ज्या सनस्क्रिनमध्ये एसपीएफचे प्रमाण २० पर्यंत असते. असे सनस्क्रिन किंवा अशा स्वरुपाचा मॉइश्चरायझर उपलब्ध झाल्यास आवर्जुन वापरा. दर दोन तासाला सनस्क्रिन लावा जेणेकरुन उन्हापासून त्वचेचे रक्षण होईल
उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर करा. बाहेर जाताना छत्री सोबत ठेवा. तुम्ही जर प्रवासात असाल तर शक्यता खाताना संयम पाळा. प्रवासादरम्यान औषधे सोबत ठेवा. ‘फर्स्ट एड बॉक्स’सोबत असणे गरजेचे आहे.