आरोग्यानामा ऑनलाईन टीम – तरुण्या टिकवण्यासाठी आणि म्हातारपण दूर ठेवण्यासाठी तूप अतिशय लाभदायक आहे. देशी गायीचे तूप हे शरीराचा विकास आणि रोग दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. या तुपाच्या सेवनाने शक्ती, वीर्य आणि आयुष्य वाढते. हे त्वचेसाठी वरदान आहे. म्हणूनच आयुर्वेदात तुपाला अमृत म्हटले आहे. तजेलदार त्वचेसाठी तुपाचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेवूयात.
हे उपाय करा
सुरकूत्या
तुप अँटीएजिंग असून हे वापरून नियमित मसाज केली तर कोशिका निरोगी होऊन चेहरा तरुण होईल.
चमकदार त्वचा
चमकदार त्वचेसाठी तुप गुणकारी आहे. यामुळे नैसर्गिक चमक टिकून राहते. तुपाने २० मिनिटे मसाज करून चेहरा २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
डोळ्यांचा थकवा
तुप हे डोळ्यांखालील डार्क सर्कल तसेच डोळ्यांवर थकवा दूर करते. डोळ्यांच्या चारही बाजूंनी तूप लावून मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन जलद होते. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
गुलाबी ओठ
फाटलेल्या ओठांवर शुध्द तुपाने मसाज केल्याने ही समस्या दूर होते. काळे ओठ गुलाबी होतात.
डार्क सर्कल
रात्री झोपण्यापुर्वी डोळ्यांखाली तुप लावा. सकाळी साध्या पाण्याने डोळे धुवून घ्या. रोज केल्यास फरक पडतो.
मुलायम त्वचा
तूप हे कोरड्या त्वचेला नरम, मुलायम बनवते. हे त्वचेच्या कोशिकांपर्यंत सहज पोहोचते. तुप थोडेसे कोमट करुन घ्या आणि ५ मिनिट या तुपाने मसाज करा. अध्र्या तासानंतर अंघोळ करा.
मॉश्चरायजर
हे मॉश्चरायजरचे काम करते. हातात तुप आणि पाणी समान प्रमाणात घेवून मसाज करा. हे १५ मिनिट राहू द्या. नंतर गार पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा केल्यास चेहरा मुलायम होतो.