आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण सुंदर आणि गोरे दिसावे हे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण आपली त्वचा कशी उजळेल यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेकांना आपल्या त्वचेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांची त्वचा खराब होते. आपल्या त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी चारकोल मास्क अतिशय फायदेशीर ठरतो.
चारकोल मास्कमुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून सूटका होते. हा मास्क घरच्या घरीही तयार करता येतो. जाणून घेऊया चारकोल मास्क कसा तयार करावा आणि त्याचे फायदे काय आहेत.
पील ऑफ मास्क –
पील ऑफ मास्क बनवण्यासाठी ३ अक्टीव्हेटेड चारकोलच्या कॅप्सूल्स घ्या. या कॅप्सुल्समध्ये व्हिटॉमिन ऑईल, बेंटोनाईट माती, ग्लिसरीन आणि मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे पाणी घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर मास्क चेहऱ्यावरून पील करा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल. त्यामुळे हा मास्क आपल्या त्वचेच्या सुंदरतेसाठी खूप फायदेशीर आहे.
पिंपल्ससाठी –
सध्याचे वाढते प्रदूषण आणि त्वचेच्या समस्या यामुळे अनेकांना पिंपल्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला जर पिंपल्सपासून सुटका मिळवयाची असेल तर चमचाभर कोरफड जेल, एक चमचा हळद आणि एक चमचा अक्टीव्हेटेड चारकोल घालून पेस्ट तयार करा. यात थोडे पाणी घालून पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील आणि तुमचा चेहरा उजळ दिसू लागेल.