आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण सुंदर दिसावं हे प्रत्येक मुलीला वाटत. त्यामुळे त्या सुंदर दिसण्याचे अनेक प्रयत्न करत असतात. अनेक मुली ब्लिच करतात. यामुळे चेहरा गोरा आणि सुंदर होतो. पण ब्लिच केल्यानंतर काही साईड इफेक्ट पण होतात. त्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ब्लिच केल्यानंतर त्वचेला होणारा त्रास टाळण्यासाठी खालील उपाय करा.
१) तुम्ही ब्लिच करायला जाण्यापूर्वी चेहर्यावर बर्फाचा मसाज करणं गरजेचं आहे. त्यामुळे २-३ मिनिटं बर्फाने मसाज केल्याने चेहर्याला होणारा त्रास कमी होतो.
२) मुली लिपबाम विकत घेताना पुरेशी काळजी घेत नाहीत. आणि चुकीच्या ब्लीचची निवड केल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या त्वचेला कोणत्या ब्लिचची गरज आहे. हे जाणून घ्या. आणि तेच ब्लिच वापरा.
३) अमोनिया फ्री ब्लिचमुळे त्वचेला नुकसान होत नाही. त्याचा वापर केल्याने त्वचेवर लालसरपणा वाढणं, खाज येणं, अॅलर्जीचा धोकाही कमी होतो. त्यामुळे अमोनिया फ्री ब्लिच वापरा.
४) ब्लिच करण्यापूर्वी त्याची पॅचटेस्ट नक्की करून घ्या. थेट त्वचेवर लावण्याआधी हातावर त्याची पॅच टेस्ट करा. जर जळजळ जाणवल्यास त्याचा वापर करण्यासाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.