आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वय वाढले की महिलांची गरोदर राहण्याची शक्यता कमी-कमी होत जाते. वाढलेल्या वयात महिला गरोदर राहिल्यास होणाऱ्या अपत्यास डाउन सिंड्रोम होण्याची शक्यता असते. तसेच इतरही जेनेटिक कमतरता जाणवू शकतात. तसेच गर्भवती महिलेला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि आरोग्याच्या अन्य समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
डाउन सिंड्रोम म्हणजे काय ?
डाउन सिंड्रोम ही एक गंभीर समस्या असून यामुळे बाळाचा विकास योग्य पद्धतीने होत नाही. बोलणे, चालणे, एखादी नवीन गोष्ट शिकण्यास तसेच इतरही समस्यांना तोंड देण्याची क्षमता कमी असते. सिंड्रोम या आजारामुळे बाळाची संपूर्ण वाढ होत नाही. ही मुले मोठी झाल्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहतात. या मुलांना स्वत:चे स्वत: खाता देखील येत नाही. या मुलांना इतरही आजार पटकन होण्याची शक्यता असते.
डाउन सिंड्रोमवर उपाय
डाउन सिंड्रोम या आजाराचे पूर्ण निदान होत नाही. परंतु सुरुवातीपासून घेतलेल्या उपचारामुळे त्यात काही प्रमाणात सुधारणा होवू शकते. यामध्ये बोलण्याची, शाररीक, व्यावसायिक आणि शैक्षणिक चिकित्सेचा सामावेश असतो.
आजार होण्याची कारणे –
हा आजर कमी वयातील महिलांच्या मुलांनाही होण्याची शक्यता असते. पण, त्याची शक्यता फार कमी असते. वयाच्या २० व्या वर्षी बाळाला जन्म देणाऱ्या महिलांमध्ये हजारात एखाद्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता असते. तर वयाच्या ३५ व्या वर्षी जन्म देणाऱ्या महिलांमध्ये हज़ारात ३ बालकांना हा आजार होतो. वयाच्या ४० व्या वर्षी बाळाला जन्म देणाऱ्या महिलांमध्ये १०० पैकी ३ केसेस असू शकतात. वयाच्या ४० व्या वर्षी गरोदर राहणे हे वैद्यकीय दृष्टीकोनातूनही चांगले मानले जात नाही.