आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक भाजीची चव वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक हा सगळ्यांच्याच घरात असतो तो म्हणजे कांदा. सेक्स लाईफ मध्ये कांदा हा उत्तम असतो हे सगळ्यांना ठाऊक आहे. अशाच या कांद्याचे अनेक उपयोग आज आपण जाणून घेऊ
– दाट केसांसाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. यामुळे केस गळती ही थांबते आणि नवीन केस येण्यास मदतही होते. कांद्याच्या रसात मध मिसळून केसांना लावल्याने खूप चांगला फायदा होतो.
– कांद्यामध्ये कार्सोटिनचे प्रमाण असल्याने अस्थमावर कांदा गुणकारी आहे.
– कांद्यात असणाऱ्या प्लॉफेनल हे शरीरात ऍन्टी ऑक्सिडंटच्या रूपात काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देते.
– कांद्यात असणाऱ्या फायबरमुळे पचन क्रिया सुरळीत चालण्यात मदत होते.
– ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांसाठी कांदा हा खूप फायदेमंद ठरतो. कांद्यात असणार क्रोमियम घटक रक्तातील साखरेचा प्रमाण कमी करून ते नियंत्रित ठेवण्याचे काम करते. कांद्यात अँटी इन्फ्लोमेशन गुण असतो जे शरीरात सल्फर इन्सुलिनला वाढवून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात मदत करते .
– कांद्याच्या सेवनाने हाडेही मजबूत होतात . हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी कांदा उपयुक्त असतो.
– जर तुम्हाला तुम्हचे वजन कमी करायचे असेल तर कांद्याचे नियमित सेवन करा.