माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
आरोग्यनामा ऑनलाईन टीम : पावसाळा आला की छान वाटत कारण त्यासोबत निसर्गातील सौंदर्य वाढते. पण त्यासोबत चिखल, घाण, वातावराणातील कुबटपणा हेही येते आणि त्यामुळे चिलटे, मच्छर, माश्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजारांना आमंत्रणच दिले जाते. त्याचा परिणाम हा मोठ्या माणसांवर होतोच पण त्याचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावर पाहायला मिळतो. त्यामुळे या माश्यांना घरातून दूर ठेवणेच योग्य आहे. पण अधिक लोकांना या माश्यांना पळवण्याचे उपायच माहित नसतात.
माश्यांना पळवण्यासाठी करण्याचे उपाय :-
१. घरगुती उपाय :
माशा पळवण्यासाठी घरगुती अनेक उपाय आहेत. त्यात कापूर, तुळस, कडूलिंब, तेल यांचा वापर करता येतो. संध्याकाळच्या वेळेला धूपा आणि कापूर एकत्र जाळल्यास माश्या कमी होतात. घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये कापूरच्या वड्या टाकाव्यात. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होण्यास मदत होते.
आपल्या घरात तुळशीचं रोपही खूप काम करून जाते. तुळशीमधील औषधी गुणधर्मासर्वांना माहित आहेच. पण तुळशीमध्ये माश्यांना दूर ठेवण्याची क्षमताही आहे. त्यामुळे घरात तुळशीचे रोप आसले पाहिजे. त्यासोबत निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहा यांच्या नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवण्यास मदत होते. या तेलाच्या वासानेही माशा, चिलटे दूर जातात.
२. स्वच्छता :
माश्या या आधिक घाणीवरच बसतात. त्यामुळे स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. त्यात घरातील किचनमध्येच सर्वाधिक माश्या असतात. शिवाय आपल्या पोटात जाणारे पदार्थ तिथेच तयार होतात. त्यामुळे किचन हे सतत स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सने किचनओटा स्वच्छ ठेवावा. अन्न थोडेही सांडले असेल तर ते लगेच धुवून पूसून घ्या. माश्या सर्वाधिक घाणीवर बसतात, म्हणून घरात कचरा उघडा ठेवू नका.
३. खिडक्या दारं बंद करा :
घरात येण्यासाठी माश्यांसाठी दार आणि खिडक्याच काय छोटीशी फटही पुरेशी असते. त्यामुळे दार खिडक्या सतत बंद ठेवाव्यात. बाहेरून आल्यावर पाय निट स्वच्छ धुवावेत.
४. इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारा :
घरातील माश्या मच्छर कमी व्हावे यासाठी घरात इंसेक्ट रेपेलंट स्प्रेचा छिडकाव करावा. हे व्यक्तिंसाठी उपयुक्त नाही. त्यामुळे तो लहान मुले आणि खाण्याच्या पदार्थांपासून दूरच ठेवावा.