‘नेल पॉलिशचे डाग’ काढण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेलपॉलिश लावली जाते. कधी कधी नेलपॉलिश निघून जाते. मात्र नखांवर काळे किंवा नेलपॉलिशच्या रंगाचे डाग पडतात. काही घरगुती उपाय वापरून हे डाग घालवता येऊ शकतात. जाणून घ्या नखांवरचे डाग घालवण्यासाठी उपाय –

१) नखांवर क्यूटिकल तेलाचे काही थेंब टाका, ज्यामुळे नखांवरील डाग काही अंशी कमी होतील.

२) अ‍ॅसिटोनमध्ये कापसाचा बोळा बुडवून १० मिनिटे नखांवर ठेवा.

३) बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिक्स करून टूथब्रशने नखांवर लावा. बेकिंग सोडाचे ब्लीचिंग गुणधर्म नखांवरील डाग साफ करण्यास मदत करतील.

४) लिंबू हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील आहे. ज्यामुळे नखांवरचे डाग साफ होतात. लिंबाच्या रसामध्ये १५ मिनिट नखे भिजवून ठेवा. त्यांनतर कोमट पाण्याने हात धुवा. त्यांनतर मॉश्चराइर लावा. नखांवरील डाग घालवण्यासाठी हा उपाय आठवड्यतून दोन वेळा करा.