शेवगा ‘या’ अनेक मोठया आजारांवर ‘गुणकारी’, प्रभावी औषध म्हणून वापरा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शेवग्याच्या शेंगा चविष्ट असतात. त्यांचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. तसेच शेवग्याच्या शेंगाची भाजी प्रचलित आहे. शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिने आणि पोषकद्रव्य असतात. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात असते.
या आजारावर शेवगा आहे गुणकारी
* पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र घेतल्यास चांगला गुण येतो.
* शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो.
* शेवग्याचा ज्यूस गर्भवती महिलेला दिल्यास प्रसूती दरम्यान त्रास होत नाही. तसेच प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात. शेवग्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए सौंदर्यवर्धक आहे. डोळ्यांसाठी ते लाभदायक आहे.
* शेवग्याचे सेवन केल्यास पिंपल्सची समस्या दूर होते. रक्तशुद्धीसाठी शेवग्याचे सूप गुणकारी आहे. यामुळे चेहरा उजळतो, पिंपल्सची समस्या नष्ट होते. शेवग्याच्या पानांचा सूप घेतल्यास अस्थमामध्ये चांगला गुण येतो.
* शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर असल्याने तोंड येण्याची समस्या शेवग्याच्या सेवनाने बरी होते.
* मधुमेह, मूतखडा, हृदयरोग, कर्करोग आदी गंभीर आजारांवर शेवगा प्रभावी औषध आहे.
* वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
* कुपोषण पिडीत लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर केला जातो. शेवग्याची मुळे जंतनाशक आहेत.