कडू कारल्यामध्ये ‘हे’ १४ औषधी गुण, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कारल्याची भाजी आपल्याकडे मोठ्याप्रमाणात खाल्ली जाते. मात्र, अनेकांना कारले कडू असल्याने आवडत नाही. कारल्याची चव कडू असली तरी त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे औषधी गुणधर्म जाणून घेतले, तर कुणीही कारल्याच्या भाजीला कडू म्हणून नाकारणार नाही. कारले ही भाजी कुकरबिटस वर्गातील आहे. अशिया, अफ्रिका आणि काही कॅरिबियन देशात कारल्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणात घेतले जाते. कारल्याचे लहान आणि मोठे असे मुख्य दोन प्रकार आहेत.
कारले औषधी का आहे?
कारल्यामध्ये ६ ग्रॅम कार्बोहाइड्रेट, १५ ग्रॅम प्रोटीन, २० मिलीग्रॅम कॅल्शिअम, ७० मिली ग्रॅम फॉस्फरस, १८ मिलीग्रॅम लोह, अ -व्हिटामिन, क- व्हिटामिन, कॅरोटिन, ग्लूकोसाइडस, सोपोनिन आणि अलकलाइड असतात. यामुळे कारले औषधी आहे. भाजी करताना करल्याचा कडवटपणा घालवण्यासाठी मिठ, लिंबू आणि मसाले घातले जातात. कारल्याची चव कडू असली तरी अरोग्य आणि सौंदर्यासाठी कारले खुपच गुणकारी ठरते. कारल्यात रोगप्रतिकारक आणि पोषक घटक असतात.
हे उपाय करा
* सावलीत वाळवलेल्या कारल्याची पावडर तयार करून रोज खाल्ल्याने मधूमेह नियंत्रणात राहतो. करल्याने स्वादुपिंड उत्तेजित होऊन इन्सुलिनचा स्त्राव वाढतो.
* कारल्यात बिटर्स आणि अलकेलाइड असल्याने रक्तशुद्धी होते.
* २० ग्रॅम कारल्याच्या रसात मध घालून पिल्याने मूतखडा विरघळतो.
* कारल्याच्या रसात लिंबाचा रस एकत्र करून पिल्याने लठ्ठपणा कमी होतो.
* कारल्यात फायबर असल्याने पचनसंस्था चांगली राहते. तसेच अपचन आणि अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.
* हदयविकाराचा त्रास असल्यास कारले सेवन करावे. अर्टरी व्हॉलवर जमा होणारे खराब कोलेस्टेरॉल कारले कमी करते. त्यामुळे हदयविकाराचा धोका कमी होतो.
* कारल्याच्या रसात सेंधे मिठ घालून खाल्ल्याने अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.
* कारल्यात अ व्हिटामिन असल्याने कारल्याची भाजी खाल्ल्याने राताधंळेपणाचा त्रास होत नाही.
* गुडघेदुखीसाठी कारल्याचा रस एक चांगला उपाय आहे.
* कारल्याच्या तिन बीया आणि तिन मिरी एकत्र उगाळून लहान बाळाला अतिशय मात्रेत पाजल्याने उलटी बंद होते.
* इन्फेक्शनच्या त्रासात कारल्याची पाने उकडून खावीत. याने रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते.
* कारले सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. त्वचारोग नाहिसे होतात.
* कारल्याच्या रसात लिंबू पिळून काहीही न खाता सकाळी पिल्याने सर्व प्रकारचे त्वचारोग नष्ट होतात.
* एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर घालून खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो.