आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पिंपल्समुळे अनेक तरूण-तरूणी खूप त्रस्त असतात. ही खुप सामान्य समस्या असली तरी टिनएजर्समध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. काही हार्मोनल बदल या वयात वेगाने होत असल्याने हा त्रास होतो. या काळात तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात. पिंपल्स नष्ट करण्यासाठी काही खास घरगुती उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
पिंपल्स का येतात ?
* टीनएजमध्ये शरीरातील सेक्स हार्मोन्स वाढतात.
* जास्त प्रमाणात जंक फूड खाणे.
* अनुवंशिकता आणि धुळीची अॅलर्जीमुळे.
* कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर.
* निर्जिव त्वचासुध्दा पिंपल्सचे कारण असते.
हे उपाय करा
* एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा हा उपाय करा. पिंपल्स नष्ट होतील.
* पुदीन्याची काही पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही पेस्ट रात्री झोपण्याआधी लावा किंवा ज्युस बनवुन लावा. हे रात्रभर ठेवा. सकाळी चेहरा धुवून घ्या. आठवड्यात पिंपल्स नष्ट होतील.
* दोन मध्यम आकाराचे लिंबु घेऊन ज्युस तयार करा. लिंबुचा रस कॉटनच्या कपड्यात घेऊन लावा. ते वाळल्यावर थंड पाण्याने धुवुन घ्या. दिवसातुन दोन वेळा हे तीन-चार दिवस लावा. पिंपल्स नष्ट होतात.
* लसुनच्या दोन पाकळ्या आणि एक लवंग दळुन घ्या. ही पेस्ट फक्त पिंपल्सवर लावा. काही वेळ राहु द्या. नंतर धुवून घ्या.
* रात्री झोपण्याआधी टूथपेस्ट पिंपल्सवर लावा. सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. पिंपल्सवर फक्त पांढरे टूथपेस्ट लावा.
* पिंपल्स होतील तेव्हा दिवसातुन दोन वेळा चार-पाच दिवस वाफ घ्या. पिंपल्स नष्ट होतील आणि चेहरा चमकायला लागेल.
* बर्फाचा तुकडा कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन लावा. तीन-चार दिवस दिवसातुन दोन वेळा लावल्याने पिंपल्स नष्ट होतील.
* संत्र्याची साल सावलीत वाळवुन त्याची पावडर बनवा. ही पावडर कमी पाण्यामध्ये मिसळुन लावा. अर्धा तासानंतर चेहरा धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा हा प्रयोग करा.
* मध हे एक नैसर्गिक अॅटीसेप्टिक आहे. पिंपल्सच्या समस्येसाठी हे रामबाण उपाय आहे. कॉटन बॉल मधामध्ये बुडवुन लावा. वाळल्यावर चेहरा धुवून घ्या.
* एक पपई मिक्सर मधुन दळुन घेवून लावा. पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
* काकडीचे साल काढुन तुकडे करा आणि मिक्सरमध्ये पेस्ट करा. ही पेस्ट लावा. दिवसातुन दोन-तीन वेळा ही पेस्ट लावा. काकडीच्या पेस्टमध्ये थोडा लिंबुचा रस आणि मध मिळवला तर त्वचा चमकदार होते.
* अॅपल साइडर व्हीनेगरमध्ये कॉटन बुडवून लावा. ते वाळल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा लावा. पिंपल्स नष्ट होतील.
* टोमॅटो बारीक करून ज्युस बनवा. हा ज्युस गाळुन लावा. वाळल्यावर चेहरा धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा लावा. पिंपल्स नष्ट होतील.