आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बहुतांश महिलांना नाजूक आणि सुंदर कंबर हवी असते. यासाठी त्या नेहमीच विविध प्रयत्न करत असतात. जीमला जाणे, डाएट करणे, असे उपाय केले जातात. परंतु, अनेकदा काहीच फरक दिसून येत नाही. तुम्हाला सुद्धा असाच अनुभव येत असेल तर येथे सांगितलेला अतिशय सोपा आणि घरगुती उपाय करून पहा. यामुळे तुमची कंबर नाजूक आणि सुंदर होऊ शकते. यासाठी रोज साधा चहा पिण्याऐवजी ब्लॅक टी पिणे सुरु करा. यामध्ये लिंबू रस मिसळून प्यायल्याने वजन लवकर कमी होते. यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
हा उपाय करा
१ यासाठी ब्लॅक टी मध्ये लिंबू मिसळून घ्या.
२ एक कप पाण्यात चहा पावडर उकळून घ्या. यामध्ये लिंबू पिळा.
३ दिवसातून तीन वेळा प्या. एक महिन्यात कंबर कमी होईल.
४ ब्लॅक टीमधील अँटीऑक्सिडेंट फॅट बर्निंग प्रोसेस वाढवते. यामुळे कमरेची चरबी कमी होते. लिंबू रसातील पॉलिफेनॉल्सने वजन कमी होते.
५ ब्लॅक टी मध्ये साखर टाकू नका.
६ या काळात जास्त कॅलरीचे, तेलकट पदार्थ खावू नका. व्यायाम करा. मॉर्निंग वॉक करा.