हे उपाय करा
* अॅसिडिटीमध्ये दुर्वा रामबाण औषध आहे. ताज्या दुर्वांचा रस (५० मिली) १० मिली दुध आणि थोडीशी साखर टाकून घेतल्यास अॅसिडिटी तत्काळ दूर होते.
* अर्धा चमचा बडीशेप एक ग्लास दुधामध्ये उकळून दिवसातून दोन वेळेस हे दुध घेतल्यास अॅसिडिटी दूर होते.
* वासनवेलीचे पाने बारीक कुटून यात थोडा अद्रकाचा रस मिसळून हे मिश्रण घ्यावे.
* २-२ तासाच्या अंतराने कांचनच्या सुकलेल्या फुलांचे २ ग्रॅम चूर्ण मध किंवा साखरेसोबत घ्यावे.
* लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.
* आंब्याच्या ताज्या कोवळ्या पानांच्या रसामध्ये थोडीशी साखर मिसळून दिवसातून तीन वेळेस घेतल्यास अॅसिडिटीची समस्या कायमची दूर होते.
* शतावरीच्या मुळांचे चूर्ण तयार करून गायीच्या दुधात उकळून हे दुध प्यावे.
* ओवा आणि धने २ ग्रॅम या समान मात्रेत घेऊन यामध्ये थोडीशी साखर मिसळून थोड्या थोड्या अंतराने हे मिश्रण सेवन करावे.
* काकडीच्या बिया खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या लवकर दूर होते.