आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रोगांचे निदान आणि उपचार करण्यासाठी प्राचीन काळापासून नैसर्गिक संपत्तीचा वापर अनेक भागात केला जात आहे. आजार गंभीर अथवा साधारण असला तरी नैसर्गिक उपचार शक्य असतात. यासाठी ही उपचार पद्धती माहिती असणे आवश्यक असते. काही दुर्गम भागातील आदीवासींना हे उपचार माहित असतात. अॅसिडिटीशी संबंधित अशाच पारंपारिक रामबाण उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
हे उपाय करा
* २-२ तासाच्या अंतराने कांचनच्या सुकलेल्या फुलांचे दोन ग्रॅम चूर्ण मध किंवा साखरासोबत घेतल्यास अॅसिडिटीची समस्या लवकर दूर होते.
* लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.
* काकडीच्या बिया खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या लवकर दूर होते.
* ताज्या दुर्वांचा ५० मिली रस, १० मिली दुध आणि थोडीशी साखर टाकून घेतल्यास अॅसिडिटी तत्काळ दूर होते.
* अर्धा चमचा बडीशेप एक ग्लास दुधामध्ये उकळून दिवसातून दोन वेळेस हे दुध घेतल्यास अॅसिडिटी दूर होते.
* वासनवेलीचे पान बारीक कुटून यामध्ये थोडा अद्रकाचा रस मिसळून हे मिश्रण घेतल्यास अॅसिडिटी कमी होते.
* आंब्याच्या ताज्या कोवळ्या पानांच्या रसामध्ये थोडीशी साखर मिसळून दिवसातून तीन वेळेस घेतल्यासअॅसिडिटी दूर होते.
* शतावरीच्या मुळांचे चूर्ण तयार करून गायीच्या दुधात उकळून घ्या. अॅसिडिटीचा त्रास दूर होतो.
* ओवा आणि धने समान २ ग्रॅम मात्रामध्ये घेऊन यामध्ये थोडीशी साखर मिसळून थोड्या-थोड्या अंतराने घ्यावे. अॅसिडिटीमध्ये आराम मिळेल.